Pune Crime | खळबळजनक ! पुण्याच्या शिवणेत पूर्ववैमनस्यातून अल्पवयीन मुलाचा पाठलाग करून गोळीबार; 7 जणांवर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुण्यातील (Pune News) एक धक्कादायक घटना समोर (Pune Crime) आली आहे. पूर्ववैमनस्यातून एका अल्पवयीन मुलाचा पाठलाग करून त्याच्यावर गोळीबार (Firing in Pune) करण्यात आल्याची घटना घडली. ही घटना शिवणे (Shivane) परिसरात घडली. याप्रकरणी 6 ते 7 जणांवर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या गोळीबारात अल्पवयीन मुलगा वाचला आहे. याबाबत अल्पवयीन मुलाने उत्तमनगर पोलीस ठाण्यात (Uttamnagar Police Station) फिर्याद दिली. अशाप्रकारे शहरात ठिकठिकाणी दहशत माजवित असल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

 

याबाबत माहिती अशी, तक्रारदार मुलगा आणि त्याचा मित्र गुरूवारी (20 जानेवारी) रोजी रात्री 9.30 च्या सुमारास मित्राच्या वाढदिवसासाठी निघाले होते. वारजे (Warje Malwadi) भागातील रामनगर (Ramnagar Warje) परिसरात दुचाकीस्वार अल्पवयीन मुलगा आणि त्याच्या मित्राला टोळक्याने अडवले. त्यावेळी दोघांना शिवीगाळ करून मारहाण केली. टोळक्यातील एकाने त्याच्याकडील पिस्तुलातून अल्पवयीन मुलावर गोळीबार (Firing) केला आहे. (Pune Crime)

 

दरम्यान, अशा पद्धीतीच्या गोळीबाराचा आवाज ऐकल्यानंतर परिसरातील नागरीक गोळा झाले. तर टोळक्यातील काहीजणांनी नागरीकांना दमदाटी देऊन विटा फेकून मारल्या आहेत. आणि पलायन झाले. पसार झालेल्या आरोपींचा पोलिस (Police) शोध घेत आहेत. याप्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पी. एम. वाघमारे (API P. M. Waghmare) करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Exciting Firing on minor boy in Pune s Shivne are FIR against 7 persons in uttamnagar police station

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा