Pune Crime | खळबळजनक! सार्वजनिक स्वच्छतागृहात आढळले जिवंत अर्भक; पोलिसांमुळे वाचले चिमुकल्याचे प्राण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | अनैतिक संबंधातून (Immoral Relationship) जन्मलेल्या एका नवजात अर्भकाला (Infant) जन्मदात्या आईनेच प्रियकराच्या मदतीने सार्वजनिक स्वच्छतागृहाच्या (Public Toilet) भांड्यात टाकल्याची घटना पुण्यात  उघडकीस आली आहे. ही घटना पुण्यातील (Pune Crime) सिंहगड रोड परिसरातील वडगाव बुद्रुक (Wadgaon Budruk) येथील तुकाईनगर (Tukai Nagar) येथे बुधवारी (दि.25) सकाळी नऊच्या सुमारास उघडकीस आली.  परंतु देव तारी त्याला कोण मारी याप्रमाणे या घटनेची माहिती मिळताच देवदूता प्रमाणे सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे (Sinhagad Road Police Station) पोलीस अंमलदार अजय माळी (Ajay Mali) व कट्टे (Katte) यांनी तात्काळ घटनास्थळी पोहचून नागरिकांच्या मदतीने स्वच्छतागृहाच्या भांड्यातून या नवजात अर्भकास बाहेर काढून त्याचे प्राण वाचविले.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सार्वजनिक महिला शौचालय समाज मंदिरामागे तुकाईनगर वडगाव येथे एका महिलेने नवजात अर्भकाला जन्म देऊन संडासचे भांड्यामध्ये कोंबून ठेवले आहे. असा कंट्रोल वरून सकाळी आठ वाजनेच्या सुमारास कॉल आला.

 

दरम्यान कॉलची माहिती मिळताच ड्युटीवर असलेले पोलीस अंमलदार माळी व कट्टे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पाहणी करताच त्यांना येथील महिला शौचालयात असलेल्या संडासच्या भांड्यात हे नवजात अर्भक रडत असलेले आढळुन आले. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता नागरिकांच्या मदतीने हे चिमुकले बाळ संडासच्या भांड्यातून वरती काढण्याचा प्रयत्न केला. परंतु हे बाळ अर्धे भांड्यात तर अर्धे लाईनमध्ये अडकले असल्यामुळे त्याला बाहेर काढणे मुश्किल झाले. त्यातच रक्तस्राव होत होता. (Pune Crime)

त्यामुळे त्यांनी हाताला तेल लावून त्या चिमुकल्या बाळाला कसे बसे संडासच्या भांड्यातून मोठ्या मुश्किलीने बाहेर काढले. व पुढील उपचारासाठी ससून रुग्णालयात (Sassoon Hospital) दाखल केले. सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे (Senior Police Inspector Shailesh Sankhe), पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे (Police Inspector Pramod Waghmare) यांनी घटनास्थळी पोहचून पाहणी केली व माळी व कट्टे यांचे अभिनंदन केले.

 

दरम्यान या निर्दयी प्रकारामुळे तुकाईनगर परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
या निर्दयी व नराधम असलेल्या महिलेस व तिला साथ देणाऱ्या तिच्या प्रियकरास ताबडतोड अटक करून
कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी येथील नागरिक करीत आहेत.
हे नवजात अर्भक मुलगा असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस अमलदार अजय माळी यांनी सदर महिलेविरुद्ध कायदेशीर फिर्याद (FIR) दिली आहे.

 

Web Title :- Pune Crime | Exciting! Just new born child found in public toilets; new born boy life was saved by the sinhagad road police

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | पुण्यात भाजपच्या 20 ते 25 कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीचे आप्पा जाधव यांच्या कार्यालयावर हल्ला, प्रचंड खळबळ

 

Jayant Patil | ‘छगन भुजबळ ओबीसी आरक्षणाबद्दल जे बोलतात ते जनतेपर्यंत पोहोचवा…’, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे कार्यकर्त्यांना आदेश 

 

Pune Crime | वीजपुरवठा खंडित केल्याच्या रागातून महावितरण कार्यालयाची तोडफोड, कोंढव्यातील घटना

 

PMC Building Construction Development | महापालिकेच्या बांधकाम विभागाचे उत्पन्न यंदा घटण्याची शक्यता ! पहिल्या दोन महिन्यांत अपेक्षेपेक्षा पन्नास टक्केच उत्पन्न