Pune Crime | खळबळजनक ! हॉटेल ‘गारवा’चे मालक रामदास आखाडेंच्या खून प्रकरणी 19 वर्षीय तरूणीस अटक, गुन्हयातील ‘रोल’ निष्पन्न

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  Pune Crime | हॉटेल व्यवसायातील स्पर्धेतून गारवा हॉटेलचे मालक रामदास आखाडे (Hotel Garva Owner Ramdas Akhade) यांचा खून केल्या प्रकरणात तलवार घरात लपवून ठेवल्याप्रकरणी लोणीकाळभोर पोलिसांनी (Loni Kalbhor Police) एका 19 वर्षीय तरूणीस अटक केली आहे. तलवार घरात लपवून आरोपींना मदत केल्याने तिला अटक (Pune Crime) करण्यात आली आहे.

‘काजल’ (वय 19) असे कोठडी सुनावलेल्या महिलेचे नाव आहे. या गुन्ह्यात यापूर्वी बाळासाहेब खेडेकर Balasaheb Khedekar (वय ५६), निखिल खेडेकर (वय २४), सौरभ ऊर्फ चिम्या चौधरी (वय २१), अक्षय दाभाडे (वय २७) करण खडसे (वय २१), प्रथमेश कोलते (वय २३), गणेश माने (वय २०), निखिल चौधरी (वय २०, सर्व रा. हवेली) आणि नीलेश आरते (वय २३) यांना अटक झाली आहे. तसेच एका १७ वर्षीय मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. उरुळी कांचन परिसरात १८ जुलै रोजी रात्री पावणे नऊच्या सुमारास आखाडे यांचा खून करण्यात आला होता.

नीलेश याने त्याचा ओळखीच्या अल्पवयीन मित्रास बोलावून घेत इतर साथीदारांच्या मदतीने आखाडे याचा तलवारीने वार करून खून केला आणि दोघे पसार झाले असल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासात उघडकीस आले.
त्यानुसार पोलिसांनी नीलेश आरते आणि त्याचा अल्पवयीन साथीदारास ताब्यात घेतले.
नीलेश याच्याकडे तपास केला असता त्याने आणि अल्पवयीन मुलाने गुन्ह्यांत वापरलेल्या दोन तलवारी लपविण्यासाठी पोत्यात गुंडाळून ‘काजल’ हिच्याकडे १८ जुलै रोजी दिल्याची माहिती पोलिसांना दिली.
पोलिसांनी बिबवेवाडी येथील घरी जाऊन काजलकडे तलवारीबाबत विचारणा केली असता तीने उडवाउडवीची उत्तरे दिली.
त्यानंतर पोलिसांनी घराची झडती घेतली असता कपाटाच्या मागे पोत्यात गुंडाळून ठेवलेल्या दोन तलवारी पोलिसांना मिळून आल्या.
त्यावर लालसर रंगाचे रक्ताचे डाग आढळून आले.
ते गुन्ह्यांत वापरले असल्याची शक्यता असल्याने तलवारी जप्त केल्या आहेत.
काजल हीने गुन्ह्यांत वापरलेल्या तलवारी लपविण्यास आरोपींना मदत केल्याप्रकरणी तीला अटक केली.

 

पाच तलवारी व कोयते घेतले बनवून :

नीलेश याच्या तडीपार कालावधीत तो पत्नी काजलसह लातूर जिल्ह्यातील मुळगाव बलसुर येथे राहत असताना ५ तलवारी कोयते बनवून घेतल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
त्यापैकी फक्त २ तलवारी हस्तगत केल्या असून इतर 3 तलवारीचा शोध घेणे,
जप्त केलेल्या तलवारी आणखी दुस-‍या गुन्ह्यात वापरल्या आहेत का? याचा तपास करायचा आहे.
त्यामुळे तिला ५ दिवसांची पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी सहायक सरकारी वकील नितीन कोंगे (Public Prosecutor Nitin Konge) यांनी केली.
न्यायालयाने तिला 29 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

लोणी काळभोर पोलिस (Loni Kalbhor Police) ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी (Rajendra Mokashi) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी गुन्हयाचा तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | Exciting ! Woman arrested in murder case of Ramdas Akhade, owner of Hotel Garva

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune News | राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला

दररोज अंघोळ केल्यानं होऊ शकतं शरीराचं नुकसान, कधी-कधी स्नान केल्यामुळं होऊ शकतात ‘हे’ 5 आश्चर्यकारक फायदे; जाणून घ्या

Paytm Jobs 2021 | खुशखबर ! Paytm 35 हजार रूपये पगारावर देणार 20 हजार अंडर ग्रॅज्युएट्सना नोकरी, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया