Pune Crime | फेसबुकवरून श्वानाचे पिल्लू खरेदी करणे पडले महागात, जाणून घ्या प्रकरण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | फेसबुकवरून (Facebook) श्वानाचे पिल्लू खरेदी करणे एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले आहे. 9 हजार रुपये घेत त्यांना श्वानाच्या पिल्लाचा मृत्यू झाल्याचे सांगत फसवण्यात आले (Pune Crime) आहे.

याप्रकरणी 34 वर्षीय व्यक्तीने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात (vishrantwadi police station) तक्रार दिली आहे. त्यानुसार फेसबुक वापरणारा अनिकेत देशमुख नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना श्वानांचा छंद आहे. त्यांनी फेसबुकवर (Facebook) सर्च केल्यानंतर त्यांना एक श्वानाचे पिल्लू विक्रीबाबत असल्याची जाहिरात दिसली. त्यात एकाने मोबाईल क्रमांक दिला होता. त्यांनी त्यावर संपर्क साधला. त्यांनी रिट्रीव्हर जातीचे श्वानांचे पिल्लू पाहिजे असल्याचे सांगितले. त्यानुसार संबंधित व्यक्तीने 9 हजार रुपये सांगितले. फिर्यादी यांनी ‘गुगल पे’वर (G-Pay) 9 हजार रुपये पाठविले. मात्र ही दिवस झाल्यानंतर देखील त्यांना हे श्वानांचे पिल्लू मिळाले नाही. मग, त्यांनी या व्यक्तीला संपर्क साधला. त्यावेळी त्याने पिल्लाचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले. तर त्यांना पसे परत न करता फसवणूक केली आहे. अधिक तपास विश्रांतवाडी पोलिस ठाण्यातील ((vishrantwadi police station)) पोलीस निरीक्षक मनीषा झेंडे ( police inspector Manisha Zende) या करत आहेत.

हे देखील वाचा

Mumbai Ratna Award | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांचा ‘मुंबई रत्न’ पुरस्काराने सन्मान

Rain in Maharashtra | मुंबईसह पुण्यातही अतिमुसळधार पावसाची शक्यता; आगामी 48 तासांसाठी कोकणात Red alert

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune Crime | Expensive to buy a puppy from Facebook, find out the case

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update