Pune Crime | बांधकाम व्यावसायिकाकडे पावणे दोन कोटींची खंडणीची मागणी, 4 जणांवर FIR; डेक्कन परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | जातीवाचक शिवीगाळ केल्याचा खोटा गुन्हा (FIR) दाखल करण्याची धमकी देऊन एका बांधकाम व्यावसायिकाकडे (Builder) पावणे दोन कोटी रुपये खंडणी (Extortion) मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात (Deccan Police Station) चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात (Pune Crime) आला आहे. यामध्ये संविधानिक टेन प्रोटेक्शन फोर्स संघटनेतील दोघांचा समावेश आहे.

 

या प्रकरणी राजन नायर (Rajan Nair), त्याची पत्नी सगाई राजन नायर Sagai Nair (रा. धायरकर कॉलनी, मुंढवा) तसेच संविधानिक टेन प्रोटेक्शन फोर्स या संघटनेतील दोन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका बांधकाम व्यावसायिकाने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे भांडारकर रस्ता (Bhandarkar Road) परिसरात कार्यालय आहे.फिर्यादी यांचे मुंढवा भागात एका गृहप्रकल्पाचे काम सुरू आहे.
आरोपींनी फिर्यादी यांच्याकडे पैशांची मागणी केली.
तसेच त्यांच्या कार्यालयासमोर आंदोलन केले होते.
बांधकाम व्यावसायिकाने पैसे देण्यास नकार दिला असता आरोपींनी जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली.
नायर आणि त्यांच्या साथीदारांनी बांधकाम व्यावसायिकाच्या विरोधात फलक लावले होते.
बांधकाम व्यावसायिकाने तक्रार अर्ज दिल्यानंतर पोलिसांनी अर्जाची चौकशी करुन चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक कल्याणी करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Extortion demand of Rs 2 crore from builder, FIR against 4 persons; Incidents in the Deccan area

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune NCP Protest | राष्ट्रवादी काँग्रेसचा पुणे महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयावर भव्य मोर्चा

Disha Salian Case | दिशा सालियन प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी; अधिवेशनात फडणवीसांची घोषणा

IPS Rashmi Shukla | रश्मी शुक्ला प्रकरणावरून अजित पवार विधानसभेत आक्रमक