Pune Crime | पुणे : 5 लाखाची खंडणी मागणाऱ्या पोलिस कर्मचार्‍यावर खंडणीचा FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | मी पोलीस आहे मला हप्ता देत नाही असे म्हणत पेट्रोलपंप चालकाकडे पाच लाखाची खंडणी मागणाऱ्या पुणे पोलीस मुख्यालयातील (Pune Police Headquarters) पोलीस कर्मचाऱ्यावर खंडणीचा (Extortion) गुन्हा (FIR) दाखल करण्यात (Pune Crime) आला आहे. प्रदिप रावसाहेब मोटे (Pradip Raosaheb Mote) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे (Police Personnel) नाव आहे. हा प्रकार लोहगाव येथील जगद्गुरु पेट्रोल पंपासमोर (Jagadguru Petrol Pump Lohgaon) 18 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी दहाच्या सुमारास घडला आहे.

याबाबत काळुराम दत्तात्रय खांदवे Kaluram Dattatraya Khandve (वय-35 रा. लोहगाव) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात (Vimantal Police Station) बुधवारी (दि.5) फिर्याद दिली आहे. खांदवे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी प्रदिप मोटे याच्याविरुद्ध आयपीसी 387, 504, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा लोहगाव येथे पेट्रोल पंप असून आरोपी हे पुणे पोलीस मुख्यालयात कार्यरत आहेत. घटनेच्या दिवशी फिर्यादी आणि त्यांचा भाऊ तुकाराम खांदवे (Tukaram Khandve) हे पंपावर असताना प्रदिप मोटे हे त्याठिकाणी आले. त्यांनी फिर्य़ादी व त्यांच्या भावाला बंडु खांदवे याला बोलवण्यास सांगितले. तसेच तुमचा पंप चांगला चालतो तुम्हाला कोणी त्रास देऊ नये यासाठी त्यांनी हप्ता मागितला.

आरोपी प्रदिप मोटे यांनी फिर्यादी यांच्याकडे 5 लाख रुपये हप्ता मागून दिला नाही तर बघून घेण्याची धमकी (Threat) दिली.
आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने पाच लाख रुपयांची खंडणी मागून फिर्यादी यांना काठीने आणि पाईपने बेदम मारहाण (Beating) केली.
यामध्ये गंभीर जखमी झालेल्या फिर्यादी यांनी याबाबत तक्रार अर्ज केला होता.
पोलिसांनी तक्रार अर्जाची चौकशी करुन प्रदिप मोटे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक लहाणे (API Lahane) करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | Extortion FIR against policeman demanding Rs 5 lakh crime news

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा