Pune Crime | जास्तीचा नफा मिळवणं पडलं चांगलंच महागात, 21 लाखांना गंडा, ऑनलाइन फसवणुक करणाऱ्या दोघांवर FIR!
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | सध्या ऑनलाइन फसवणुकीच्या (Online Fraud) गुन्ह्यांमध्ये (Pune Crime) मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहेत. अशाचप्रकारे आमच्या कंपनीमध्ये पैसे गुंतवा तुम्हाला जास्त नफा मिळवून देतो सांगत एकाला 21 लाख 66,000 रूपयांना गंडा (Financial Fraud) घातला आहे.
याबाबत गोपाल व्यंकट राजू Gopal Venkat Raju (48, रा. पदमजी पेपर मिल समोर, थेरगाव) यांनी वाकड पोलीस स्टेशनमध्ये
(Wakad Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी (Pune Police) आयपीसी 420, 406, माहिती तंत्रज्ञान अधिनियम 66 डी नुसार गुन्हा (FIR) दाखल (Pune Crime ) केला आहे.
संजय आणि हितेश (पूर्ण नाव पत्ता माहित नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. हा प्रकार जुलै 2021 ते 5 मे 2022 या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी (Plaintiff) यांना एसएमएस करून Tradeshotfx
या अस्तित्त्वात नसलेल्या कंपनीमध्ये पैसे गुंतवल्यास जास्तीचा (Profit From Investing Money) परतावा मिळेल, असं अमीष त्यांना दाखवून पैसे गुंतवण्यास भाग पाडले.
फिर्यादी यांचा विश्वास बसण्यासाठी आरोपींनी, फिर्यादी यांना फायदा झालेल्या लोकांचे स्क्रीनशॉट पाठवले.
त्यानंतर फिर्यादी यांनी आरोपींच्या वेबसाईटला भेट दिली असता लोकांना चांगला फायदा मिळत असल्याचं दिसून आलं.
त्यामुळे फिर्यादी यांनी आरोपींना के. वाय. सी. डॉक्युमेंट पाठवून ऑनलाइन खातं उघडलं.
याच खात्याद्वारे फिर्यादी यांनी पैशाची गुंतवणूक केली. यानंतर आरोपींनी फिर्यादी यांना परताना मिळाल्याचं भासवून वेगवेगळ्या
बँक खात्यामध्ये एकूण 21 लाख 66 हजार रुपये भरण्यास भाग पडून आर्थिक फसवणुक (Cheating Case) केली.
पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल लोहार (API Anil Lohar) हे करत आहेत.
Web Title :- Pune Crime | Extra profit has to be made very expensive, bribe of Rs 21 lakh, FIR against two online fraudsters!
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Vaani Kapoor Killer Look | कॅज्युअल लुकमध्ये दिसली वाणी कपूर, पैपराझी समोर दिल्या किलर पोज..