Pune Crime | तरुणींना म्हणाले, ‘चल बैठ घुमने जाते है’ आणि गेले पोलीस काेठडीत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | कारमध्ये बसून तीन तरुणींची छेड काढणाऱ्या दोन तरुणांना पुणे पोलिसांनी २४ तासांच्या आत अटक केली आहे. कारमधून चाललेल्या दोन तरुणांनी त्यांच्या कारची खिडकी खाली करून त्यांच्या वसतिगृहात पायी जाणाऱ्या तीन तरुणींची ‘चल बैठ घुमने जाते है’ म्हणून छेड काढल्याची घटना पुण्यातील कोथरूड परिसरात घडली होती. त्यानंतर त्वरित कारवाई करत पुणे पोलिसांनी त्या दोन तरुणांना अटक केली. (Pune Crime)

संकेत पोपट शेळके आणि सागर काणेकर असे त्या दोघांचे नाव असून, कोथरूड येथे ते त्यांची कार (एम एच १२ यूएन १३३२) उभी करून त्यात बसले होते. त्यावेळी भारतीनगर भागात हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या तीन तरुणी तिथून चालल्या होत्या. तेव्हा त्यांच्या गाडीची काच खालती घेऊन ‘चल बैठ घुमने जाते है’ म्हणून छेड काढली. या घटनेमुळे त्या तरुणी प्रचंड तणावात होत्या, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई करत ती कार शोधली आणि आरोपींना अटक केली आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे,
पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, एसपी गजानन टोम्पे, दरोडा वाहन चोरीविरोधी पथक एकचे
पोलीस निरीक्षक उल्हास कदम, पोलीस नाईक धनंजय ताजने आणि चंद्रकांत जाधव यांनी केली.
या कारवाईनंतर सामाजिक माध्यमांवर पुणे पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले जात आहे.

Web Title :- Pune Crime | eye teasers arrested within hours of crime by pune police amitabh gupta police commissioner pune crime news

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Supriya Sule | ‘शरद पवारांनी लाठ्या खाल्ल्या; पण माघार नाही घेतली’ – सुप्रिया सुळे

Mumbai High Court On Abortion | मुंबई उच्च न्यायालयाने दिली सशर्त गर्भपाताची परवानगी