Pune Crime | पुणे पोलिसांकडून मुलुंडमधील बनावट कॉल सेंटर उध्वस्त ! लोनच्या नावाने कोटयावधीची फसवणूक, 40 मोबाईल जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | दत्तवाडी पोलिसांनी (Dattawadi Police) ठाण्याच्या मुलुंड वेस्टमधील (Mulund West) एका बनावट कॉल सेंटरचा (Fake Call Center) पर्दाफाश केला आहे. एका नामांकित लाईफ इन्शुरन्सच्या नावाने हे कॉल सेंटर बेकायदेशीरपणे चालविले जात होते. याप्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. (Pune Crime)

दानेश रविंद्र ब्रिद Danesh Ravindra Bidra (25, रा. सर्वोदयनगर, हरिश्री रेसीडेन्सी, फेज-1, अंबरनाथ वेस्ट, ठाणे) आणि रोहित संतोष पांडे Rohit Santosh Pandey (24, रा. रूम नं. 11, संगमसदन, किसन नगर नं. 1, वागळे इस्टेट, ठाणे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. दत्तवाडी पोलिसांनी कॉल सेंटरमध्ये वापरण्यात येणारे तब्बल 40 मोबाईल हॅन्डसेट, 7 टीबी क्षमतेच्या कॉम्प्युटर हार्डडिस्क, 1 एनव्हीआर, आणि इतर महत्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत. सदरील कॉल सेंटरमध्ये 43 मुले-मुली काम करत होते. (Pune Crime)

कॉल सेंटरमधील मुले-मुली या सेल्स एक्झिकेटीव्ह म्हणून महाराष्ट्रातील नागरिकांना कॉल करून नागरिकांचा विश्वास संपादन करून पन्नास लाखाची पॉलिसी काढल्यानंतर झिरो टक्के व्याज दराने पन्नास लाख रूपयांचे कर्ज मंजुर करून देण्याचे आमिष दाखत असत. नागरिकांकडून त्यांचे आधारकार्ड, कॅन्सल चेक, फोटो आणि इतर महत्वाच्या गोष्टी व्हॉट्सअ‍ॅपवरून मागवून घेत तसेच कर्जाचे 6 महिन्यांचे हप्ते 2 लाख 50 हजार रूपये असले सांगत. त्यापैकी 1 लाख 25 हजार रूपये अगोदर भरण्यास भाग पाडून नागरिकांची फसवणूक करीत होते. याप्रकरणी अज्ञात आरोपींविरूध्द पुण्याच्या दत्तवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेऊन सिंहगड रोड विभागाचे सहाय्यक आयुक्त सुनिल पवार (ACP Sunil Pawar) यांनी दत्तवाडी पोलिसांना तपासाबाबत सुचना दिल्या होत्या.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय महाजन (Senior Police Inspector Abhay Mahajan)
यांनी तात्काळ दत्तवाडी पोलिस ठाण्यातील सायबर पथकास आरोपींचा शोध घेण्याबाबत सुचना केल्या.
पोलिस पथकाने गुन्हयाचा तपास करून कॉल सेंटरवर छापा टाकून दोघांना अटक केली आणि साहित्य जप्त केले.

पोलिस उपायुक्त (झोन-3) सुहेल शर्मा (DCP Suhail Sharma), सहाय्यक आयुक्त सुनिल पवार,
व.पो.नि. अभय महाजन, पोलिस निरीक्षक (गुन्हे) विजय खोमणे (Police Inspector Vijay Kohmne)
यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील उपनिरीक्षक अक्षय सरवदे, पोलिस अंमलदार काशिनाथ कोळेकर,
जगदिश खेडकर, अनुप पंडित, सुर्या जाधव आणि प्रसाद पोतदार यांनी बनावट कॉल सेंटरवर छापा टाकून कारवाई केली आहे.

Web Title :-Pune Crime | Fake call center in Mulund destroyed by Pune police! Crores of fraud in the name of loan, 40 mobiles

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

 

हे देखील वाचा

Samruddhi Highway | समृद्धी महामार्गावर कारला भीषण आग, कार जळून खाक; पुण्यातील कुटुंब थोडक्यात बचावलं

Thackeray Group | नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का; ‘राऊतांची पाठ फिरली अन् नगरसेवक देखील फिरले…’