Pune Crime | निवृत्त IAS महिला अधिकाऱ्याच्या मुलाच्या नावाने बनावट प्राप्तीकर आणि जीएसटी भरणा, सायबर पोलीस ठाण्यात FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime |  एका निवृत्त (Retired ) महिला आयएएस अधिकाऱ्याच्या (IAS Officer) मुलाच्या पॅन कार्डचा वापर करुन प्राप्तिकर भरणा (Income Tax) केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. मुलाचे करपात्र उत्पन्न नसताना आरोपींनी बनावट कागदपत्रांद्वारे (Fake Document) भरणा करुन सरकार आणि प्राप्तीकर विभागाची फसवणूक (Fraud) केल्याप्रकरणी पुणे सायबर पोलीस ठाण्यात (Pune Cyber Police Station) गुन्हा दाखल करण्यात (Pune Crime) आला आहे.

 

याप्रकरणी पौड रस्ता (Paud Road) परिसरात राहणाऱ्या निवृत्त महिला अधिकाऱ्याने पुणे सायबर पोलिसांकडे (Pune Police) तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी चार जणांविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायदा (Information Technology Act) आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

 

फिर्यादी यांचा मुलगा परदेशात नोकरी (Abroad Job) करतो. त्यांच्या मुलाला प्राप्तीकर भरणा करायचा असल्याने फिर्यादी यांनी प्राप्तीकर विभागात (Income Tax Department) जाऊन चौकशी केली. त्यावेळी त्यांना मुलाने 2011 पासून नियमित कर भरणा केल्याची माहिती मिळाली.
प्राप्तिकर अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती ऐकून त्यांना धक्का बसला.
चौकशी दरम्यान त्यांच्या मुलाचे पॅनकार्ड (Pancard) वापरुन बनावट प्राप्तिकर भरण्यात आल्याचे समोर आले.

याशिवाय फिर्यादी यांच्या मुलाच्या नावाने वस्तू आणि सेवा कर (GST) भरल्याचे समोर आले.
यानंतर निवृत्त महिला आयएस अधिकाऱ्यांनी सायबर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार अर्ज दाखल केला.
महिला अधिकाऱ्याच्या तक्रार अर्जावरुन पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी.एस. हाके (Senior Police Inspector D.S. Hake) करत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | fake income tax payment in the name of retired ias officer womans son pune cyber crime news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Anti Corruption Bureau (ACB) Pune | 50 हजारांची लाच मागणारा कनिष्ठ अभियंता अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

 

Leopard in Pune | पुण्यातील विश्रांतवाडीतील DRDO संस्थेत बिबट्याचा वावर ?, परिसरात प्रचंड खळबळ

 

Pune Crime | व्याजाच्या पैशासाठी 3 सावकारांचा तगादा, युवकानं उचललं टोकाचं पाऊल