Pune Crime | पुण्यात 10 हजारांमध्ये Fake Voter ID, PAN Card? बनावट ID, ‘पॅन’ तयार करणार्‍या बुलढाणा जिल्हयातील खामगावमधील इस्टेट एजंटला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | बनावट पॅनकार्ड (Fake PAN Card), मतदान ओळखपत्र (Voting Identity Card) तयार करुन देणाऱ्या एकाला गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) खंडणी विरोधी पथकाने (Anti Extortion Cell Pune) बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी मुळचा बुलढाणा (Buldhana) येथील असून तो जमीन खरेदी विक्रीचे (Real Estate – इस्टेट एजंट) व्यवहार करत असल्याचे तपासात समोर आले आहे. कल्पेश रमेश बोहरा Kalpesh Ramesh Bohra (वय-42 रा. खामगाव, जि. बुलढाणा) असे अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपीचे (Pune Crime) नाव आहे.

 

याबाबत पथकातील कर्मचारी मधुकर तुपसौंदर (Madhukar Tupsaunder) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Bundgarden Police Station)
फिर्याद दिली आहे. खंडणी विरोधी पथकाने ही कारवाई पुणे स्टेशन (Pune Railway Station) परिसरात केली आहे.

आरोपीकडून वेगवेगळ्या व्यक्तीच्या नावाची दहा बनावट मतदार ओळखपत्र, संगणक जप्त करण्यात आला आहे. संगणकामध्ये बनावट मतदार ओळखपत्र,
पॅनकार्ड तसेच काहीजणाची छायाचित्रे आढळून आले आहेत. (Pune Crime)

 

कल्पेश बोहरा हा जमीन खरेदी विक्रीचा व्यवहार करत होता. तो लोकांना बनावट मतदान ओळखपत्र तसेच पॅनकार्ड तयार करुन देत होता. यासाठी तो पैसे घेत होता. याबाबतची माहिती खंडणी विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून बोहराला अटक केली. आरोपी बोहरा बनावट पॅन कार्ड आणि मतदान ओळखपत्र तयार करुन देण्यासाठी 10 हजार रुपये घेत असल्याची प्राथमिक माहिती तपासात समोर आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव (PSI Jadhav) तपास करत आहेत.

Web Title :- Pune Crime | Fake Voter ID, PAN Card in 10 thousand in Pune? Real Estate agent from Khamgaon in Buldhana district arrested for making fake ID and PAN Card

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pope Francis To Declare Devasahayam Pillai A Saint | देवसहायम पिल्लई यांना पोप फ्रान्सिस यांनी घोषित केले संत, ही उपाधी मिळवणारे ठरले पहिले भारतीय

Diabetes Diet | फास्टिंग ब्लड शुगर लेव्हल कमी करायची असेल तर डायबिटीज रूग्णांनी खावे ‘या’ 5 गोष्टींचे भरीत, जाणून घ्या

Pune Crime | गडचिरोली येथून आणलेल्या गांजाची पुण्यात विक्री? चौघांना गुन्हे शाखेकडून अटक, अडीच लाखांचा गांजा जप्त

Cancer Treatment | शास्त्रज्ञांचा दावा – एक्सरसाईज सोबत खा ‘या’ 2 स्वस्त गोष्टी, कॅन्सरचा धोका 70% होईल कमी; जाणून घ्या

PMI CV Manufacturing Plant in Pune | पुण्यात इलेक्ट्रिक बस उत्पादक कंपनी PMI उभारणार नवीन मॅन्यूफॅक्चरिंग प्लांट, होणार 2500 बसेसचे उत्पादन