Pune Crime | बनावट मतदान ओळखपत्र, आधार कार्ड, पॅनकार्डद्वारे दुर्लक्षीत जमिनीचे करायचे व्यवहार, गुन्हे शाखेकडून 7 जणांच्या टोळीला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | बनावट आधार कार्ड (Fake Aadhaar Card), पॅन कार्ड (PAN Card) आणि मतदान ओळखपत्र (Voting ID Card) तयार करुन दुसऱ्यांच्या दुर्लक्षित जमिनी परस्पर विकणाऱ्या टोळीला गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) खंडणी विरोधी पथक एकने (Anti Extortion Cell Pune) बेड्या (Arrest) ठोकल्या आहेत. आरोपी प्रॉपर्टी एजंट (Property Agent In Pune) असून ते दुर्लक्षीत जमिनीची गुगल मॅप द्वारे (Google Maps) व इतर प्रॉपटी यांची माहिती घेऊन त्या जमिनीचे मालक (Landowners) मिसिंग अथवा मयत असल्याची खात्री करुन त्या जागेचे कागदपत्रे सरकारी कार्यालयातून काढत होते. त्यानंतर या जमीनींची विक्री करत असल्याचे तपासात निष्पन्न (Pune Crime) झाले आहे.

कल्पेश रमेश बोहरा (Kalpesh Ramesh Bohra) हा टोळीचा मुख्य सुत्रधार असून त्याला यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. खंडणी विरोधी पथकाने कल्पेश बोरासह उमेश जगन्नाथ बोडके Umesh Jagannath Bodke (वय-47 रा. नारायणवाडी, कल्याण (पश्चिम), अमोल गोविंद ब्रह्मे Amol Govind Brahme (वय-58 रा. राजाराम पुलाजवळ, सिंहगड रोड, पुणे), सचिन दत्तात्रय जावळकर Sachin Dattatraya Javalkar (वय-41 रा. इगल सोसायटी, कोथरुड गावठाण, पुणे), सय्यद तालीब हुसैन सय्यद जामिन हुसैन Syed Talib Hussain Syed Jamin Hussain (वय-43 रा. खामगाव, बुलढाणा), प्रदिप अनंत रत्नाकर Pradip Anant Ratnakar (वय-54 रा. बदलापूर पुर्व, ठाणे), मोहम्मद असिफ मोहम्मद युनुस Mohammad Asif Mohammad Yunus (वय-38 रा. खामगाव, बुलढाणा) अशा एकूण 7 आरोपींना अटक केली आहे.(Pune Crime)

आरोपी दुसऱ्यांच्या दुर्लक्षित, पडीक जमिनीच्या मालकांची महसूल विभागातून (Revenue Department) तसेच गुगल मॅपच्या माध्यमातून माहिती घेऊन, त्या जमिनीच्या मालकाचे बनावट आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र तसेच बनावट कागद पत्रांच्या साह्याने बँक खाते उघडत होते. बँक खाते उघण्यासाठी खऱ्या जमिन मालकाच्या नावाने बानावट माणूस बँकेत उभा करत होते. या कागदपत्रांच्या आधारे आरोपी समोरील पार्टीला जमिनीची विक्री करत होते. याच पद्धतीने आरोपींनी सहाय्यक दुय्यम निबंधक मुळशी (पौड) येथील कार्यालयात एक खरेदीदस्त नोंदवला आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून खंडणी विरोधी पथकाने लॅपटॉप, प्रिंटर, स्कॅनर, बनावट शिक्के बनवण्याची मशीन, 8 मोबाईल, बनावट नावाने घेतलेली सिमकार्ड, तयार केलेले बनावट मतदान ओळखपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, डेबिट कार्ड, बँक पासबुक आणि इतर बनावट कागदपत्रे जप्त केली आहेत.

या टोळीचा मुख्य सूत्रधार कल्पेश बोहरा आणि त्याचे इतर प्रॉपर्टी एजंट सहकारी जमिनीची परस्पर विक्री करत होते. याशिवाय ते आपल्या देशात अवैध मार्गाने येणारे घुसखोर, समाज विघात कृत्य करणारे व्यक्ती, लँड माफिया (Land Mafia) यांना हवाला द्वारे पैशाचे व्यवहार करण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार करुन देत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याबाबत मिलिटरी इंटेलिजन्स, लायझन युनिट, पुणे (Military Intelligence, Liaison Unit, Pune) यांनी पोलीस आयुक्तांना पत्र लिहून माहिती दिली होती. त्यापार्श्वभूमीवर या गुन्ह्याचा तपास करुन खंडणी विरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे -1 गजानन टोम्पे (ACP Gajanan Tompe)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजय वाघमारे (Police Inspector Ajay Waghmare),
सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाडवी (API Sandeep Padvi),
पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव (PSI Vikas Jadhav),
अविनाश लोहोटे (PSI Avinash Lohote), पोलीस अंमलदार यशवंत ओंबासे,
मधुकर तुपसौंदर, अस्लमखान पठाण, संजय भापकर, रविंद्र फुलपगारे, हेमा ढेबे,
अजय उत्तेकर, नितीन कांबळे, रमेस चौधर, गजानन सोनवलकर, दुर्योधन गुरव, अमोल आवाड,
राजेंद्र लांडगे, नितीन रावळ, विवेक जाधव, विजय कांबळे, सुरेंद्र साबळे, अमर पवार, संदीप कोळके,
नितेश जाधव, शिवाजी सातपुते यांच्या पथकाने केली.

 

Web Title : Pune Crime | Fake voting cards, Aadhar cards, PAN card neglected land
transactions pune police crime branch arrest 7 who look lands from google maps

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ की घसरण? जाणून घ्या आजचे ताजे दर

 

Maharashtra Monsoon Updates | मुंबईत 6 जूनला मान्सूनची एन्ट्री?
राज्यात ‘या’ तारखेला वरुणराजाचं आगमन होणार; IMD चा अंदाज

 

Pune Municipal Corporation (PMC) | पावसाळा पूर्व कामांना अद्याप म्हणाविशी गती नाही;
आयुक्तांनी तीनही अतिरिक्त आयुक्तांकडे सोपविली जबाबदारी

 

Pune PMC Water Supply | सूस, म्हाळुंगे आणि बावधन बुद्रूक मधील पाणी पुरवठा प्रकल्पाचा आराखडा
आठवड्याभरात तयार होणार

लवकरच निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरूवात केली जाईल –
विक्रम कुमार, महापालिका आयुक्त