Pune Crime | पुण्यात सुप्रसिद्ध अभिनेता अनिकेत विश्वासराव याच्याविरुद्ध पत्नी आणि अभिनेत्री स्नेहा यांच्याकडून कौटुंबिक हिंसाचार आणि मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

पुणे : Pune Crime | मराठी अभिनेता अनिकेत विश्वासराव (Aniket Vishwasrao) याच्याविरुद्ध त्याच्या पत्नीने मानसिक व शारीरीक छळ केल्याची फिर्याद (Pune Crime) दिली आहे. यामुळे मराठी सिनेसृष्टीत एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी स्नेहा अनिकेत विश्वासराव sneha Aniket Vishwasrao (वय 29, रा. करिष्मा सोसायटी, कर्वे रोड) यांनी फिर्याद दिली आहे.

करियरमध्ये आपल्यापेक्षा पत्नीचे नाव मोठे होईल या भितीने जीवे मारण्याची धमकी देऊन गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
हाताने मारहाण करुन लोकांसमोर अपमानास्पद वागणूक देऊन अतोनात छळ केल्याचे या फिर्यादीत म्हटले आहे. अनिकेत विश्वासराव याच्याबरोबर त्याच्या आईवडिलांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिकेत विश्वासराव आणि स्रेहा चव्हाण (Actress sneha Chavan) यांचा 2018 मध्ये विवाह झाला आहे. स्रेहा चव्हाण यांनी मालिका तसेच चित्रपटात काम केले आहे. अनिकेत विश्वासराव हा मुळचा मुंबईचा आहे़ गेल्या काही दिवसांपासून स्नेहा व अनिकेत यांच्यात वाद होत होता. स्रेहा हिने अलंकार पोलीस ठाण्यात (Alankar Police Station) मानसिक व शारीरीक छळ केल्याची फिर्याद दिली असून पोलिसांनी गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे.

अनिकेत विश्वासराव हा मराठी चित्रपट, नाटक, दूरचित्रवाणी मालिका माध्यमातून अभिनेता म्हणून सर्वपरिचित आहे.
सुधीर मिश्राच्या चमेलीमधून त्याने पर्दापण केले आहे. लपून छपून या मराठी चित्रपट सृष्टीत पर्दापण केले आहे.

अनिकेत यांच्यासह चंद्रशेखर रघुनाथ विश्वासराव (Chandrashekhar Raghunath Vishwasrao)
आणि अदिती चंद्रशेखर विश्वासराव (Aditi Chandrashekhar Vishwasrao) यांच्या विरुद्ध देखील अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा (Pune Crime) दाखल करण्यात आला आहे.

हे देखील वाचा

Pune News | ‘त्यांच्या घरात पाणी देण्याचा माझा जो मानस आहे तो निश्चित पूर्ण करेल’ – अमोल बालवडकर

ICC Tournaments Schedule | भारत दोन वर्ल्ड अन् चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे करणार आयोजन, ICCची मोठी घोषणा

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pune Crime | Famous actor Aniket Vishwasrao has been charged with domestic violence and assault by his wife and actress Sneha Vishwasrao-Chavan in alankar police station of pune pune crime news

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update