Pune Crime | पुण्यातील प्रसिध्द बांधकाम व्यवसायिक युवराज ढमालेंना गाडीखाली चिरडण्याची धमकी ! 15 लाखांच्या खंडणीप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुण्यातील प्रसिध्द बांधकाम व्यवसायिक युवराज ढमाले (Yuvraj Dhamale) यांना गाडीखाली चिरडून मारण्याची धमकी देण्यात आली असून 15 लाखांच्या खंडणीची (Ransom) मागणी देखील करण्यात आली. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) गुन्हा दाखल (Pune Crime) करण्यात आला आहे.

रवीलाल देवजीलाल प्रजापती Ravilal Devjilal Prajapati (वय 40), जितू प्रजापती Jitu Prajapati (रा. कोंढवा) आणि एका अज्ञात व्यक्तींविरुद्ध खंडणी, जीवे मारण्याची धमकी देणे अशा कलमान्वये (IPC 384, 386, 387,34) गुन्हा दाखल (Pune Crime) करण्यात आला आहे. याप्रकरणी युवराज सिताराम ढमाले Yuvraj Sitaram Dhamale (रा. धनकवडी) यांनी फिर्याद दिली आहे.  ढमाले हे बांधकाम व्यवसायिक (Yuvraj Dhamale Builders & Developers) आहेत. त्यांची कोंढव्यातील गोकुळ हॉटेल (Hotel Gokul, Kondhwa) समोर साईट सुरू आहे. काम पुर्ण झालेल्या बांधकामाच्या साईटवरील बहुतांश फ्लॅटचा ताबा काही सदस्य वगळता इतर सर्वांना देण्यात आलेला आहे. त्यांनी फ्लॅट धारकांची सहकारी गृहनिर्माण संस्था अंतर्गत सोसायटी स्थापन केली आहे.

आरोपी देवजीभाई प्रजापती यांना फ्लॅटचा ताबा दिलेला आहे. तरीदेखील प्रजापती याने जितू प्रजापती व अन्य आरोपीच्या मदतीने सदस्यांनी मिटींग बोलावुन, कॉमन ॲमिनिटीजचा ताबा अजुन आम्हाला दिला नाही असे म्हणत वाद घातला. सोसायटीच्या सदस्यांना भडकवुन तुमच्याविरुद्ध तक्रार करायला भाग पाडुन, तुमची बदनामी करीन अशी धमकी दिली. तसेच १५ लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करून रक्कम न दिल्यास गाडीखाली चिरडुन टाकण्याची धमकी दिली. याप्रकरणी ढमाले (Builder Yuvraj Dhamale) यांनी तक्रार आणि आवश्यक पुरावे दिल्यानंतर पोलिसानी गुन्हा (Pune Crime) दाखल केला असून तपासला सुरुवात केली आहे. यासंदर्भात ढमाले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

Web Title :- Pune Crime | Famous Pune builder Yuvraj Dhamale threatened to be crushed under car ! FIR lodged at Kondhwa police station for Rs 15 lakh ransom on Ravilal Devjilal Prajapati and Jitu Prajapati

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Sitaram Kunte | ठाकरे सरकारचा निर्णय ! राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांचा कार्यकाळ वाढवला

PMC Bank चे USFB मध्ये होणार विलीनीकरण, ‘पीएमसी’च्या ग्राहकांना 10 वर्षात मिळणार पूर्ण पैसे

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात 768 जण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Corporation | ATM System मधील कोट्यवधीच्या भ्रष्टाचाराची ED कडे तक्रार करण्याची गर्जना करणारे कॉंग्रेस,
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक प्रस्ताव मंजुरीच्यावेळी सभागृहातून ‘गायब’ !
राष्ट्रवादी कॉंग्रेसने ‘युटर्न’ घेत दिली भाजपला साथ