Pune Crime | वॉचमनला वायफाय, केबलवाला असल्याचे सांगून सोसायटीत घरफोडी करणारा फरासखाना पोलिसांच्या जाळ्यात, 9.65 लाखाचा मुद्देमाल जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | सोसायटीच्या वॉचमनला वायफाय (WiFi), केबलवाला (Cable) असल्याचे सांगून सोसायटीमधील बंद घराचे कुलूप तोडून घरातील किमती वस्तु चोरणाऱ्या (Thieves) गुन्हेगाराला फरासखाना पोलिसांनी (Faraskhana police) अटक (Arrest) केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून 5 गुन्हे उघडकीस (Pune Crime) आले असून 9 लाख 65 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. प्रज्वल गणेश वानखेडे उर्फ रेवणन्नाथ (Prajwal Ganesh Wankhede alias Revanannath) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

 

फरासखाना पोलीस ठाण्याच्या (Faraskhana Police Station) हद्दीतील सोसायटीमधील एका घराचे कुलूप तोडून घरातील किमती वस्तूंची चोरी झाल्याचा गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला होता. हा प्रकार सोमवारी (दि.9) घडला होता. या गुन्ह्याचा तपास करत असताना तपास पथकाला (investigation Team) घटनेच्या दिवशी घटनास्थळाजवळ एक संशयतीत व्यक्ती फिरता दिसला. त्याची चौकशी केली असता तो लॉजमध्ये राहत असल्याचे समजले. पोलिसांनी बुधवारी (दि.11) प्रज्वल वानखेडे उर्फ रेवणन्नाथ (वय-25 रा. पडेगाव फाटा, औरंगाबाद-Aurangabad) याला ताब्यात घेतले.(Pune Crime)

 

आरोपीकडे असलेल्या बॅगेची पाहणी केली असता त्यामध्ये 1 लॅपटॉप, 2 मोबाईल, 1 जीओ कंपनीचे राऊटर, 1 एअर पॉड, एक स्पोर्टचे घड्याळ, कटर, चांदीचे दागिने (Silver Jewelry) आढळून आले. पोलिसांनी हा सर्व मुद्देमाल जप्त करुन गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण 1 लाख 74 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन अटक केली. आरोपीची पोलीस कोठडी घेऊन त्याच्याकडे सखोल चौकशी केली.

 

चौकशी दरम्यान त्याने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या (Bharati Vidyapeeth Police Station) हद्दीत केलेल्या 4 गुन्ह्यांची कबुली दिली.
पोलिसांनी या गुन्ह्यातील चोरीला गेलेले 4 लाख 35 हजार 400 रुपयांचे 152 ग्रॅम वजनाचे सोने (Gold), 395 ग्रॅम चांदीचे दागिने तसेच 3 लाख 65 हजार रुपयांचे लॅपटॉप
(Laptop) जप्त केले. फरासखाना पोलिसांनी 5 गुन्हे उघडकीस आणून सोने-चांदीचे दागिने, 7 लॅपटॉप, 1 दुचाकी असा एकूण 9 लाख 65 हजार 400 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
आरोपी बनावट नावाने लॉजमध्ये रहात असल्याचे तपासात समोर आले आहे.

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेंद्र डहाळे (Addl CP Rajendra Dahale), पोलीस उप आयुक्त परिमंडळ 1 डॉ . प्रियंका नारनवरे
(DCP Dr. Priyanka Naranvare), सहा पोलीस आयुक्त फरासखाना विभाग सतिश गोवेकर ACP Satish Govekar)
यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे (Senior Inspector of Police Rajendra Landage),
पोलीस निरीक्षक गुन्हे शब्बीर सय्यद (Police Inspector Shabbir Sayyad), सहायक पोलीस निरीक्षक सुशील बोबडे
(API Sushil Bobade), पोलीस उपनिरीक्षक अभिजीत पाटील (PSI Abhijeet Patil), अजितकुमार पाटील (PSI Ajit Kumar Patil),
पोलीस अंमलदार समीर माळवदकर, अभिनय चौधरी, रिजवान जिनेडी, मेहबुब मोकाशी, सचिन सरपाले, राकेश क्षिरसागर, संदीप कांबळे,
समीर माळवदकर, ऋषीकेश दिघे, सयाजी चव्हाण, वैभव स्वामी, मोहन दळवी, प्रविण पासलकर, गणेश आटोळे, महावीर वलटे यांचे पथकाने केली आहे .

 

Web Title :-  Pune Crime | Faraskhana Police seize Rs 9.65 lakh worth of burglary in Society

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Liver Disease Causes Symptoms And Prevention | यकृताचे आजार वाढत आहेत, जाणून घ्या याची कारणं आणि त्यापासून बचाव करण्याचे उपाय

Nitu Chandra | सकारात्मकता हिच खरी यशस्वी होण्याची ऊर्जा – नितु चंद्रा

Munmun Dutta Glamorous Photo | शॉर्ट ड्रेस घालून कॅमेरा समोर बोल्ड झाली बबीता जी, व्हायरल फोटोनं इंटरनेटचं वाढलं तापमान…