Pune Crime | अनैतिक संबंधातून जन्म झाल्याच्या संशयावरुन बापानेच केला 3 वर्षाच्या ‘मुस्कान’ चा खून, आंबेगाव बुद्रुक परिसरातील घटना

0
180
Pune Crime Father kills 3 year old girl Muskan on suspicion of born from immoral relationship
File photo

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | अनैतिक संबंधातून (Immoral Relationship) जन्म झाल्याच्या संशयाने बापानेच आपल्या तीन वर्षाच्या मुलीला मारहाण करुन तिचे डोके भिंतीला आपटून तिचा खून (Murder In Pune) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी (Bharti Vidyapeeth Police Station) मुलीच्या बापाला अटक केली आहे (Pune Crime). ही घटना आंबेगाव बुद्रुक (Ambegaon Budruk) परिसरात घडली आहे.

 

मुस्कान (वय ३) असे खून झालेल्या मुलीचे नाव आहे. याप्रकरणी २४ वर्षाच्या मुलीच्या आईने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे पती – पत्नी आहेत. त्यांची मुलगी मुस्कान हिचा अनैतिक संबंधातून जन्म झाल्याचा बापाला संशय होता. (Pune Crime)

यावरुन त्यांच्यात नेहमी वादावादी होत असत. या संशयावरुनच बापाने मुस्कान हिला हाताने मारहाण करुन तिचे पाय धरुन तिला उलटे करुन वर खाली व पुढे मागे करुन तिचे डोके भिंतीला आदळून जखमी केले.
तसेच ती झोपलेली असताना तिच्या गालावर हाताने थापडी मारुन तिचे पाय पकडून तिला डोक्याच्या दिशेने भिंतीला धडकवले.
असा प्रकार त्याने १३, १४ व १५ एप्रिल रोजी रात्री करत होता. त्यातून १५ एप्रिल रोजी तिचा मृत्यु झाला.
त्यानंतर तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात (Sasoon Hospital) पाठविण्यात आला.
तेव्हा डॉक्टरांनी डोक्याला जखम झाल्याने मृत्यु झाल्याचा अहवाल दिला.
त्यानंतर पोलिसांनी दोघा पती पत्नीकडे चौकशी केली.
त्यात हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन बापाला अटक केली आहे.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा 

 

Web Title :- Pune Crime | Father kills 3 year old girl Muskan on suspicion of born from immoral relationship

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा