Pune Crime | सावत्र मुलावर कोयत्याने सपासप वार करुन केला खून, फरार आरोपी बापाला 3 तासात ठोकल्या बेड्या

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | घरगुती भांडणातून बापाने सावत्र मुलाचा (step son) कोयत्याने सपासप वार करुन खून (Murder) केल्याची घटना पुणे जिल्ह्यातील (Pune Crime) बारामती तालुक्यातील पारवाडी येथे घडली आहे. याप्रकरणी तालुका पोलीस स्टेशन (Taluka Police Station) गुन्हेशोध पथकाने वनविभागाच्या झाडीत लपलेल्या आरोपीला अटक केली आहे. पोलीस निरीक्षक महेश ढवाण (Police Inspector Mahesh Dhawan) यांनी याबाबत माहिती दिली. पोलिसांनी या गुन्ह्यातील आरोपीला अवघ्या तीन तासात अटक केली आहे.

पारवाडी गावचे पोलीस पाटलांनी गावच्या हद्दीत शिपकुले वस्ती येथे कातकरी समाजातील एकने स्वत:च्या मुलाचा कोयत्याने डोक्यात वार करुन खून केल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक ढवाण यांनी घटनास्थळी धाव घेतली. तपासामध्ये आरोपी मारुती साधुराम जाधव (Maruti Sadhuram Jadhav) हा मजुरीसाठी पारवडी गावचे हद्दीत आला असून त्यांचा सावत्र मुलगा गोपीनाथ मारुती जाधव (Gopinath Maruti Jadhav) याच्यासोबत घरगुती कारणावरुन भांडण झाले होते. त्या रागातून आरोपीने मुलाच्या डोक्यात कोयत्याने सपासप वार करुन खून करुन पळून गेल्याची माहिती समोर आली.

Pune Petrol Price | ‘पेट्रोल-डिझेल’च्या दराचा दररोज नवीन ‘उच्चांक’; जाणून घ्या नवे दर

आरोपीला पकडण्यासाठी गुन्हेशोध पथक आरोपीच्या मागावर पाठवण्यात आले. आरोपी मोबाईल वापरत नसल्याने त्याचा शोध घेणे कठीण होते. तसेच त्याचे कोणी नातेवाईक नसल्याने आरोपीचा फोटो मिळणे अवघड होते. पोलिसांनी घटनास्थळापासून वनविभागाचा 10 ते 15 किमीचा परिसरात पायी चालत आरोपीचा शोध घेतला. झाडीत लपलेल्या आरोपीला पोलिसांनी केवळ तीन तासात बेड्या ((Pune Crime)) ठोकल्या.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख (SP Dr. Abhinav Deshmukh), अपर पोलीस अधीक्षक मिलींद मोहिते (Additional Superintendent of Police Milind Mohite), उपविभागिय पोलीस अधिकारी गणेश इंगळे (Sub-Divisional Police Officer Ganesh Ingle), पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस कॉन्स्टेबल राहुल पांढरे, नंदु जाधव, विजय वाघमोडे, विनोद लोखंडे यांच्या पथकाने केली.

हे देखील वाचा

Solapur Crime | दुर्दैवी ! जीममध्ये व्यायाम करताना डॉक्टरचा मृत्यू, सोलापूरच्या मोहोळमधील घटना

Aryan Khan Drugs Case | ‘किंग’ खान ‘शाहरूख’कडे 25 कोटींची मागणी ! 18 कोटींवर डील झाली; NCB च्या वानखेडेंना 8 कोटी द्यायचे असं बोलणं सुरु होतं, ‘त्या’ बॉडिगार्डचा दावा

Nagpur Crime | भाजप नगरसेवकाच्या घरातून चोरट्यांनी तिजोरी पळवली, 50 तोळे सोनं अन्…

 

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pune Crime | father kills step son in baramati pune rural police arrested father

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update