Pune Crime | मांजरी खुर्द येथील आर.एस. डेअरी फार्मवर FDA चा छापा, 899 किलो नकली पनीर जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | अन्न व औषध प्रशासन कार्यालयाच्यावतीने (Food and Drug Administration) हवेली तालुक्यातील मांजरी खुर्द येथील मे. आर. एस डेअरी फार्म (R. S Dairy Farm Manjri Khurd) या विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या कारखान्यावर छापा मारुन नकली पनीर (Fake Paneer) बनवित असल्याचे आढळून आल्याने कारवाई (Pune Crime) करुन साठा जप्त करण्यात आला.

 

या कारखान्यावर छापा टाकून 1 लाख 97 हजार 780 रुपये किंमतीचे 899 किलो नकली पनीर, पनीर बनविण्यासाठी वापरण्यात येणारी 2 लाख 19 हजार 600 रुपये किंमतीची 549 किलो स्किम्ड मिल्क पावडर (Skimmed Milk Powder) आणि 4 हजार 544 रुपये किंमतीचे 28.4 किलो आर बी डी पामोलीन तेल (RBD Palmolein Oil) असा एकूण 4 लाख 21 हजार 924 रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात (Pune Crime) आला आहे. पनीर हा पदार्थ नाशवंत असल्याने जप्त केलेला साठा जागेवरच नष्ट करण्यात असून घेण्यात आलेले नमुने पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहे.

सण उत्सवांच्या कालावधीत ग्राहकांची फसवणूक (Fraud) करुन कमी दर्जाचे अन्न पदार्थ विक्री होण्याची शक्यता आहे.
अशा प्रकारची बाब निदर्शनास आल्यास नागरिकांनी प्रशासनाच्या 1800222365 या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवावी,
आपले नाव गुप्त ठेवण्यात येईल असे आवाहन प्रशासनाचे
पुणे विभागाचे सह आयुक्त संजय नारागुडे (FDA Joint Commissioner Sanjay Naragude) यांनी केले आहे.

 

Web Title :- Pune Crime | FDA raids R.S. dairy farms at Manjari Khurd 899 kg of fake paneer seized

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा