Pune Crime | येरवडा कारागृहामध्ये दोन कैद्यात तुंबळ हाणामारी, पाणी भरण्याच्या वादातून दोघांना मारहाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पिण्याचे पाणी (Drinking Water) भरण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून दोन कैद्यांना (Prisoner) सिमेंटच्या पत्र्याने मारहाण (Beating) करण्यात आली. या घटनेत दोन कैदी जखमी झाले असून मारहाण केल्या प्रकरणी दोन कैद्यांना अटक (Arrest) केली आहे. टिकलसिंह गब्बरसिंह (Tikalsinh Gabbarsinh), अजिनाथ लक्ष्मण गायकवाड (Ajinath Laxman Gaikwad) अशी अटक करण्यात आलेल्या कैद्यांची (Pune Crime) नावे आहेत.

 

आरोपींनी केलेल्या मारहाणीत कैदी सोनू शेटे (Sonu Shete), किशोर मंजुळे (Kishore Manjule) जखमी झाले आहेत. याप्रकरणी कारागृह अधिकारी अभिजीत यादव (Abhijeet Yadav) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात (Yerawada Police Station) फिर्याद दिली आहे. हा प्रकार येरवडा कारागृहात गुरुवारी (दि.19) सकाळी सव्वा नऊच्या सुमारास घडला आहे. (Pune Crime)

 

येरवडा कारागृहातील सर्कल क्रमांक एक कार्यालयासमोर कैदी टिकलसिंह, अजिनाथ गायकवाड यांचा सोनू शेटे, किशोर मंजुळेशी वाद झाला. वादाचे पर्यवसन हाणामारीत झाले. दोघांनी सिमेंटच्या पत्र्यांने शेटे आणि मंजुळेला मारहाण केली. शेटे आणि मंजुळेवर उपचार करण्यात आले असून पोलीस उपनिरीक्षक शेलार (PSI Shelar) तपास करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | fighting among inmates yerawada jail two were beaten over argument over water

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा