Pune Crime | गुलटेकडी परिसरात किरकोळ कारणावरुन 2 महिलांमध्ये ‘राडा’, दोघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | तोंडाकडे पाहून थुंकल्याच्या कारणावरुन दोन महिलांमध्ये वाद (Dispute) होऊन त्याचे रुपांतर हाणामारीत (Fighting) झाले. यामध्ये एका महिलेने दुसऱ्या महिलेच्या डोक्यात विट मारुन गंभीर जखमी (Seriously Injured) केले. याप्रकरणी पोलिसांनी (Pune Police) तिघांवर गुन्हा (FIR) दाखल करुन दोन जणांना अटक (Arrest) केली आहे. हा प्रकार पुण्यातील (Pune Crime) गुलटेकडी येथील मीनाताई ठाकरे वसाहतीत (Meenatai Thackeray Colony Gultekdi) बुधवारी (दि.30 मार्च) रात्री आठच्या सुमारास घडला.

 

प्रियंका चंद्रकांत पवार Priyanka Chandrakant Pawar (वय-24 रा. मिनाताई ठाकरे वसाहत, गुलटेकडी) असे जखमी झालेल्या महिलेचे नाव असून त्यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात (Swargate Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अरुणा लक्ष्मण चव्हाण (Aruna Laxman Chavan), आदित्य लक्ष्मण चव्हाण Aditya Laxman Chavan (वय-19), ओम लक्ष्मण चव्हाण Om Laxman Chavan (तिघे रा. औद्योगिक वसाहत, गुलटेकडी) यांच्यावर गुन्हा दाखल करुन अरुणा आणि आदित्य चव्हाण यांना अटक केली आहे. (Pune Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी हे एकाच गल्लीत राहतात. अरुणा चव्हाण या महिलेने फिर्यादी यांच्याकडे पाहून थुंकले (Spit). यावरुन फिर्यादी यांनी अरुणा चव्हाण या महिलेला शिवीगाळ केली. याचा राग मनात धरुन आरोपी अरुणा हिने इतर आरोपींना फोन करुन बोलावून घेतले. आरोपींनी फिर्यादी यांच्या घरात घुसुन हाताला धरुन बाहेर ओढत आणले. आरोपींनी फिर्यादी यांना अश्लील शिवीगाळ (Obscene Swearing) करुन लाथा बुक्क्यांनी मारहाण (Beating) केली. तर अरुणा यांनी फिर्यादी यांच्या डोक्यात वीट मारुन गंभीर जखमी केले. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक जमदाडे (API Jamdade) करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | fighting in two women, two arrested in Gultekdi area

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

TV AC Mobile Price Hike | 1 एप्रिलपासून ग्राहकांवर महागाईचा भार ! टीव्ही, एसी, Mobile महागणार; तर CNG वाहनधारकांना दिलासा

 

Thackeray Government | ठाकरे सरकारचा निर्णय ! राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वाहतूक भत्त्यात वाढ

 

Punit Balan Group | तिसरी ‘एस. बालन T-20 लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा ! पुनित बालन ग्रुप संघाचा विजयाचा चौकार; अर्थव काळेची नाबाद शतकी खेळी