Pune Crime | एकच फ्लॅट दोघांना विकणार्‍या बिल्डरवर गुन्हा दाखल; मुंबईच्या प्रसिद्ध डॉक्टरची फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन Pune Crime | मुंबईतील प्रसिद्ध डॉक्टरची आर्थिक परिस्थितीची माहिती काढून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यांना वारजे येथील बांधकाम साईटवरील दोन फ्लॅट घेण्यास प्रवृत्त केले. प्रत्यक्षात त्यांच्याकडून पैसे घेऊन ते फ्लॅट बांधकाम व्यावसायिकाने दुसर्‍या व्यक्तीला विक्री करुन डॉक्टरांची फसवणूक (Cheating With Mumbai Doctor) केल्याचा प्रकार समोर (Pune Crime) आला आहे.

 

याप्रकरणी खडक पोलिसांनी (Khadak Police Station) प्रियंक देवमन पटेल Priyank Devman Patel (रा. वारजे),
वैभव एकनाथ मारकड Vaibhav Eknath Markad (रा. नारायण पेठ) आणि चेतन रावजीभाई पटेल Chetan Ravjibhai Patel (रा. एकबोटे कॉलनी) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.

 

याप्रकरणी डॉ. राजेश जगन्नाथ पटेल Dr. Rajesh Jagannath Patel (वय ४७, रा. खारघर, मुंबई) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीची आर्थिक परिस्थितीची माहिती काढून फिर्यादींचा विश्वास संपादन केला.
वारजे येथील बांधकाम साईटमध्ये दोन फ्लॅट घेण्यास प्रवृत्त केले.
या फ्लॅटची किंमत एका वर्षात दुप्पट होईल, असे आमिष (Pune Crime) दाखवले.
याबाबत त्यांनी ५ मे २०१४ रोजी करार करुन फिर्यादी यांनी दोन फ्लॅट विकत घेतले.
त्यासाठी मारकड डेव्हलपर्स (Markad Developers) व बालाजी ग्रुप (Balaji Group) या नावावर त्यांनी ३९ लाख रुपये दिले.
या फ्लॅटचा ताबा डिसेंबर २०१५ मध्ये देण्याचे आश्वासन दिले होते.
प्रत्यक्षात त्यांनी हे फ्लॅट दुसर्‍या व्यक्तीला विकून फिर्यादीची फसवणूक (Pune Crime) केली.

 

Web Title : Pune Crime | Filed a case against a builder who sold the same flat to both; Fraud of Mumbai’s famous doctor

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Best healthy food for kids | मुलांना ताकदवान बनवायचे असेल तर खाऊ घाला ‘हे’ 6 पदार्थ, आजार राहतील दूर, जाणून फायदे

Pune News | बाणेर-बालेवाडी-पाषाण : काळ्या अंधारातून दीपावलीच्या निमित्ताने प्रकाशाकडे जाणारा ‘सुर संध्या’ एक चांगला कार्यक्रम – मुरलीधर मोहोळ

WhatsApp च्या या जुन्या फीचरमध्ये होणार मोठा बदल, तुम्ही सुद्धा नक्कीच करत असाल वापर; जाणून घ्या