Pune Crime | पुण्यात ‘ते’ होर्डिंग लावणाऱ्याविरुद्ध अखेर गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | कात्रज चौकाजवळ जुन्या रस्त्यावर कात्रजचा खून झाला (Murder of Katraj) अशा आशयाचे विचित्र होर्डिंग उभारण्यात आले होते. त्यामुळे मंगळवारी दिवसभर याचीच चर्चा शहरात रंगली होती. तर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. हे होर्डिंग कोणी लावले हे मात्र स्पष्ट झाले नसले तरी भारती विद्यापीठ पोलीस (bharati vidyapeeth police) ठाण्यात हे होर्डिंग लावणाऱ्या अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा (Pune Crime) दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी हनुमंत तुकाराम लोणकर ( रा.कोंढवा) यांनी फिर्याद दिली आहे.

कात्रज चौकाजवळ जुन्या रस्त्यावर हे होर्डिंग उभारण्यात आले असून त्यावर रक्ताने माखलेला चाकूचे चित्र असलेला आणि त्यावर कात्रजचा खुन झाला असा विचित्र मजकुर लिहिला होता.
त्यामुळे पुण्यात या होर्डिंगचीच चर्चा दिवसभर सुरु होती.
हे होर्डिंग कोणी लावले हे समोर आले नसले तरी उलट सुलट चर्चेला ऊत आला होता.
होर्डिंग लावण्याची परवानगीही घेतली नसल्याचे समोर आले होते. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरणही पसरले होते.
भारती विद्यापीठ पोलिसांकडुनही या प्रकरणचा तपास सुरु होता.
अखेर महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाच्यावतीने फिर्याद देण्यात आली.
त्यानुसार अनोळखी व्यक्तिविरुद्ध सार्वजनिक मालमत्तेचे विद्रूपीकरण केल्याच्या कायद्यानुसार गुन्हा (Pune Crime) दाखल करण्यात आला आहे.

हे देखील वाचा

Pune News | खुशखबर ! मुंबईच्या धर्तीवर पुणे, पिंपरीतील झोपडपट्टीधारकांना मिळणार 300 चौरस फुटांची घरे

Bank Holidays In October | ऑक्टोबरमध्ये 21 दिवस बंद राहतील बँका, जाणून घ्या कोणत्या राज्यात केव्हा-केव्हा बंद आहेत बँका, येथे पहा पूर्ण List

Police Raid | खंडणी वसुलीसाठी पोलिसांची छापेमारी ! 3 तरुणांना बेदम मारहाण एकाचा मृत्यू; 6 पोलीस निलंबित

खुशखबर ! UIDAI ने ‘आधार’ बनवण्यासाठी व्हेरिफिकेशन फी केली फक्त 3 रुपये

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pune Crime | finally filed case against who hold flex in katraj chow as a murder of katraj bharati vidyapeeth police station

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update