Pune Crime | शालेय मुलीच्या लैंगिक शोषणाची प्रशासनाकडून गंभीर दखल, ‘तो’ नराधम शिक्षक निलंबित

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | इंदापूर तालुक्यातील भिगवण परिसरात एका प्राथमिक शाळेतील शिक्षकाने (Primary School Teacher) सहावीतील विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे (Obscene) करुन गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस (Pune Crime) आला होता. या प्रकरणाची जिल्हा प्रशासनाकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. याप्रकरणी नराधम शिक्षक दादासाहेब अंकुश खरात (Dadasaheb Ankush Kharat) याला जिल्हा परिषदेने (Zilla Parishad) निलंबित (Suspended) केले आहे. या माध्यमातून जिल्ह्यात अशा प्रकारच्या घटनांची गंभीर दखल घेतली जाईल, असा इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद (CEO Ayush Prasad) यांनी दिला आहे.

 

भिगवण (Pune Crime) येथील शालेय विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचार प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती (Inquiry Committee) नेमण्यात आली होती. या समितीने दिलेल्या प्राथमिक अहवालानुसार संबंधित शिक्षक दोषी आढळून आला होता. या नंतर आयुष प्रसाद यांनी खरात याचे निलंबन करण्याचा निर्णय घेतला.

 

यासंदर्भात बोलताना प्रसाद म्हणाले, हे अतिशय गंभीर प्रकरण असून यात कोणाचीही गय केली जाणार नाही.
या प्रकरणात स्थानिक पुढारी तसेच नागरिकांकडून संबंधितावर दबाव आणण्याचा प्रयत्न होत आहे.
याशिवाय काही स्थानिक मुक्त पत्रकारांनी या मुलीशी आणि तिच्या सोबतच्या मुलांची चौकशी केल्याचे समजले.
हे प्रकरण पॉक्सो कायद्यांतर्गत (POCSO Act) येत असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षकांना (SP) यामध्ये लक्ष घालण्यास सांगितले आहे.
यात कोणताही खासगी किंवा शासकीय व्यक्ती आढळून आला तर त्याची गय केली जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

 

आतापर्यंत 60 जण निलंबित

जिल्हा परिषदेत लैंगिक घटना उघड झाल्यानंतर आतापर्यंत 60 हून अधिक जणांना निलंबित करण्यात आले आहे.
पॉक्सो कायद्यात अनेक बाबी गोपनीय ठेवाव्या लागतात.
त्यामुळे या घटनेत काही त्रुटी राहिल्या असल्यास संबंधित सर्व जबाबदार व्यक्तींवर कारवाई होईल हे निश्चित असे आश्वासन आयुष प्रसाद यांनी यावेळी दिले.

 

 

 

Web Title : –  Pune Crime | finally suspended that teacher bhigwan Indapur taluka of pune crime news

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा