Pune Crime | आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी दि पुणे पोस्ट्स अँड टेलिकॉम सोसायटीचे माजी अध्यक्ष नागेश नलावडे यांच्यासह 23 संचालकांवर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | दि पुणे पोस्ट्स अँड टेलिकॉम को-ऑपरेटिव्ह क्रेडिट लि. सोसायटीच्या (The Pune Posts and Telecom Co-operative Credit Ltd. Society) आर्थिक गैरव्यवहार, भ्रष्टाचार आणि सार्वजनिक पैशाचा अपहार प्रकरणी सोसायटीचे सभासद गणेश तिखे (Ganesh Tikhe) यांनी जिल्हा न्यायालयात अ‍ॅड राजेश कातोरे (Rajesh Katore) यांच्यामार्फत अर्ज केला होता. त्यावर एमपीआयडी न्यायालयाचे (MPID Court) न्यायाधीश एस. एस. गोसावी (Judge S. S. Gosavi) यांच्यासमोर सुनावणी झाली असून नियमबाह्य रक्कम हाताळून त्या रकमेचा अपहार करणे, संस्थेची रक्कम वापरून बेकायदेशीर जमीन खरेदी करून त्याचे छोटे भूखंड करून रोखीने बेकायदेशीरपणे विकल्याप्रकरणी दि पुणे पोस्ट्स अँड टेलिकॉम को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे (Pune Crime) माजी अध्यक्ष नागेश नलावडे (Nagesh Nalawade) यांच्यासह 23 संचालकांवर गुन्हा (FIR) दाखल करण्याचे आदेश एमपीआयडी न्यायालयाने दिले आहेत.

Chandrakant Patil | भाजपला हरवणे सोपे नाही, BJP चा राष्ट्रवादीला इशारा

तिखे यांनी तक्रार अर्जात असे म्हंटले आहे की, नोटाबंदी झाल्यानंतर सोसायटीने रोखीने मुदत ठेवी स्वीकारून रोख कर्ज वाटप केले. कर्जवसुली करून काळा पैसा पांढरा केला. संस्थेचे कॅशबुक बदलणे, खोटे कॅश बुक तयार करणे, खोट्या आणि बोगस फर्म आणि कंपनीमार्फत बेकायदेशीर सभासद बक्षीस खरेदी, भेटवस्तू खरेदी करून कोट्यवधींचा अपहार, भ्रष्टाचार करणे तसेच खोटे आणि बोगस नावाने बँकेमध्ये अकाऊंट ओपन करून सभासदांना रोखीने कर्ज देणे, याशिवाय शासनाच्या सेवाकराची फसवणूक (Cheating) करणे, अनावश्यकपणे ओव्हर ड्राफ्टद्वारे मालमत्ता खरेदी करण्यासाठी संस्थेच्या पैशाचा अपहार करणे, संस्थेच्या पैशाचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी वापरणे, फसवणूक केल्याचेही त्यांनी म्हटले (Pune Crime) आहे.

माजी अध्यक्ष नागेश नलावडे, सचिव रेखा किशोर दैठणकर (Secretary Rekha Kishore Daithankar),
व्यवस्थापक राजेंद्र कोळेकर (Rajendra Kolekar) आणि अन्य संचालक यांनी आर्थिक फायद्यासाठी संस्थेच्या माध्यमातून गैरव्यवहार केले असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
मोठ्या पैशांची अफरातफर केली असून संचालक मंडळाने सिद्धार्थ प्रॉपर्टीज (Siddharth Properties) यांच्यासोबत नियमबाह्य आर्थिक खरेदी करणे,
त्या खरेदीत भ्रष्टाचार झाल्याने तसेच सिद्धार्थ प्रॉपर्टीज यांच्यामार्फत संस्था कर्मचाऱ्यांच्या नावे चेकद्वारे लाच स्वीकारणे, नियमबाह्य, बेकायदेशीरपणे,
जाणीवपूर्वक सभासद, ठेवीदार आणि संस्थेची जाणीवपूर्वक फसवणूक करून संस्थेचे आर्थिक नुकसान केले.
संस्थेच्या मूळ कर्मचाऱ्यांना डावलणे, त्यानं कमी केले.
व त्या जागी संचालकांनी स्वतःच्या नातेवाईकांची बेकायदेशीर मार्गाने नोकरभरती केल्याचे उघड झाले आहे.
दरम्यान,गंभीर स्वरूपाचा हा दखलपात्र गुन्हा असून या प्रकरणांचा पोलिसांकडून तपास होणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने आदेशात नमूद (Pune Crime) केले आहे.

हे देखील वाचा

Pune Petrol Price | ‘पेट्रोल-डिझेल’च्या दराचा दररोज नवीन ‘उच्चांक’; जाणून घ्या नवे दर

 

Shivajirao Bhosale Bank Fraud | शिवाजीराव भोसले बँक आर्थिक घोटाळा प्रकरणात साताऱ्यातून आणखी एकाला अटक

 

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pune Crime | FIR against 23 directors including former president of The Pune Post and Telecom Society Nagesh Nalawade in financial malpractice case

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update