Pune Crime | फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यातील बांधकाम व्यावसायिकांवर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | गृहप्रकल्पाची जागा व इमारत सोसायटीच्या नावाने हस्तांतरण (कन्व्हेयन्स – Convenience) करुन देणे बंधनकारक असतानाही 25 वर्षात ते करुन न देता फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तिन बांधकाम व्यावसायिकांविरुद्ध (Builder) समर्थ पोलीस ठाण्यात (Samarth Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. पुरुषोत्तम विठ्ठलदास लड्डा (Purushottam Vitthaldas Ladda), राजेंद्र मनसुख मंत्री (Rajendra Mansukh Mantri) आणि अशोक विठ्ठलदास बजाज Ashok Vitthaldas Bajaj (सर्व रा. व्हाईट हाऊस, सदाशिव पेठ-Sadashiv Peth) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची (Pune Crime) नावे आहेत.

 

याबाबत हरकचंद देवीचंद जैन Harakchand Devichand Jain (वय 66, रा. विठ्ठल स्मृती गृहरचना संस्था, नाना पेठ-Nana Peth) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार 15 डिसेंबर 1995 पासून आतापर्यंत घडला आहे. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेसर्स लड्डा, मंत्री आणि बजाज भागीदारी फर्मचे आरोपी तिघे भागीदार आहेत.
त्यांनी विहित मुदतीत विठ्ठल स्मृती गृहरचना मर्यादित (Vitthal Smriti Housing Limited) ही इमारत बांधली.
गृहप्रकल्पाची जागा व इमारत संस्थेच्या नावाने हस्तांतरण (कन्व्हेयन्स) करणे बंधनकारक आहे.
असे असतानाही अद्यापपर्यंत त्यांनी ते करुन दिले नाही. याबाबत फिर्यादी यांनी वेळोवेळी कल्पना दिली असता त्यांनी कन्व्हेयन्स डीड (Convenience Deed) करुन देतो, असे सांगितले.
परंतु, त्यांनी गृहरचना संस्था रजिस्टर झाल्यापासून आतापर्यंत कोणतेही डिड कन्व्हेयन्स करुन दिलेले नसून फिर्यादी व फिर्यादीच्या गृहरचना संस्थेची फसवणूक (Cheating) केली म्हणून गुन्हा नोंद केला आहे.
सहायक पोलीस निरीक्षक खोपडे (API Khopde) तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | FIR against 3 builders for fraud in samarth police station

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा