Pune Crime | पुण्यात विवाहीतेच्या आत्महत्या प्रकरणात सॉफ्टवेअर इंजीनियर पतीसह 5 जणांवर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुण्यातील वानवडी परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीच्या आठव्या मजल्यावरून उडी (Jump) मारुन एका विवाहितेने आत्महत्या (Pune Crime) केल्याची घटना मंगळवारी (दि.11) दुपारच्या सुमारास घडली. कल्याणी अजितकुमार प्रधान Kalyani Ajitkumar Pradhan (वय-32 रा. फ्लॅट नं.806 बिल्डींग ड्रीम्स आकृती सोसा. काळेपडळ, हडपसर) असे आत्महत्या (Suicide in Pune) करणाऱ्या महिलेचे नाव आहे. महिलेच्या आत्महत्या प्रकरणात सॉफ्टवेअर इंजीनियर (Software Engineer) पतीसह 5 जणांवर वानवडी पोलीस ठाण्यात (Wanwadi Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

 

 

अजितकुमार अनंतचरण प्रधान (Ajitkumar Anantcharan Pradhan), पद्मावती प्रधान (Padmavati Anantcharan Pradhan), अनंतचरण प्रधान (Anantcharan Pradhan), अभिमन्यू प्रधान (Abhimanyu Pradhan), ममता प्रधान Mamata Pradhan (सर्व रा. फ्लॅट नं.806 बिल्डींग ड्रीम्स आकृती सोसा. (Dream Akruti Society) काळेपडळ, हडपसर – Kalepadal Hadapsar) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत मयत कल्याणी प्रधान यांची बहिण पाबन किशोरचंद्र परिडा Paban Kishorechandra Parida (वय-42 रा. मिर्जापुर Mirzapur राज्य ओरीसा Orissa) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुलेट घेण्यासाठी पैसे दिले नाहीत.
तसेच लग्नात दिलेले दागिने (Jewelry) कमी वजनाचे भरल्याने पती अजितकुमार आणि त्याच्या घरच्यांनी कल्याणीला त्रास दिला.
तसेच दागिने वाढवून आणण्यासाठी माहेरुन पेसे आणावेत यासाठी वारंवार शिवीगाळ करुन मारहाण (Beating) केली.
पती आणि सासरच्या जाचाला कंटाळून कल्याणीने इमारतीच्या 8 व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिपक लगड (Senior Police Station Deepak Lagad) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वाडकर (PSI Wadkar) पुढील तपास करीत आहेत.

 

 

 

Web Title :- Pune Crime | FIR against 5 including software engineer husband in marital suicide case in Pune

 

 

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Blood Sugar Control | ‘ही’ 7 लक्षणे दिसताच व्हा सावध, जाणून घ्या अचानक कमी झाली ब्लड शुगर तर काय करावे

 

Coronavirus in Maharashtra | राज्यात ‘कोरोना’चा प्रादुर्भाव वाढला!, गेल्या 24 तासात 46, 406 नवे रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Corona Treatment | कोविडवर उपचारासाठी ‘ही’ 3 औषधे घेण्याचा केंद्र सरकारने दिला सल्ला; जाणून घ्या मेडिसीनची नावे