Pune Crime | कर्ज मंजूर करण्याच्या बहाण्याने फसवणूक, नमो सेना अध्यक्ष, अखिल मराठी पत्रकार परिषदेच्या अध्यक्षासह 5 जणांवर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | 8 कोटींचे कर्ज मंजूर करुन देण्यासाठी प्रोसेसिंग फीच्या नावाखाली 12 लाख रुपये घेऊन फसवणूक (Fraud) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सहकारनगर पोलिसांनी (Pune Police) नमो सेनेचा (Namo Sena) अध्यक्ष व आखिल मराठी पत्रकार परिषदेचा अध्यक्षासह (Akhil Marathi Patrakar Parishad ) 5 जणांविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

याप्रकरणी धनकवडीतील एका ४५ वर्षाच्या व्यवसायिकाने सहकारनगर पोलीस ठाण्यात (Sahakar Nagar Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी किशोर बिरदमल भंडारी Kishore Birdmal Bhandari (वय ६५), योगेश किशोर भंडारी Yogesh Kishore Bhandari (वय ३९), संदीप बाळु घोरपडे Sandeep Balu Ghorpade (वय ३५), सुजाता संदिप घोरपडे Sujata Sandeep Ghorpade (वय ३०), प्रसाद चंद्रकांत घोरपडे Prasad Chandrakant Ghorpade (वय ३३) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २२ फेब्रुवारी २०१९ ते ३१ जानेवारी २०२२ दरम्यान घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी एचडीएफसी बँकेकडून १ कोटी ६० लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. बँकेने तडजोड करुन १ कोटी ३० लाख रुपये भरण्यास सांगितले.
त्यांच्याकडे एवढे पैसे नसल्याने किशोर भंडारी याने त्यांना फॉरेन फंडसमधून ८ कोटी रुपये कर्ज मंजूर करुन देण्याचे आमिष दाखविले.

प्रोसेसिंग फी म्हणून ९ लाख रुपये योगेश भंडारी याने आरटीजीएस द्वारे स्वीकारले.
तसेच किशोर भंडारी याने संदीप घोरपडे व सुजाता घोरपडे यांची ओळख करुन देऊन ८ कोटी रुपयांकरीता दीड टक्के प्रोसेसिंग फी भरण्यास सांगितले. ते ३ लाख २० हजार रुपये प्रसाद घोरपडे यांच्या खात्यात भरण्यास भाग पाडले.
कर्ज मंजूर न करता तसेच त्यांचे फर्ममध्ये गुंतवणुक न केल्यामुळे फिर्यादीने गुंतवलेले १२ लाख रुपये परत मागितले.
तेव्हा त्यांनी फिर्यादी यांना “मी नमो सेनेचा अध्यक्ष व आखिल मराठी पत्रकार परिषदेचा अध्यक्ष आहे.

माझे कोणी वाकडे करुन शकत नाही. कोणी काही प्रयत्न केला तर गोळ्या घालून मारुन टाकील.
माझे राजकीय पुढार्‍यांशी उठणे बसणे आहे,” अशी धमकी दिली.
संदीप घोरपडे याने फिर्यादीच्या मोबाईलवर हातात पिस्तुल घेतलेले गुंडाचे फोटो व इतर राजकीय पुढार्‍यांबरोबरचे
फोटो पाठवून फोन करुन पैसे परत देणार नाही, अशी धमकी दिली.
या धमकीमुळे त्यांनी घाबरून आता पोलिसांकडे धाव घेतली.
पोलीस निरीक्षक पासलकर (Police Inspector Pasalkar) अधिक तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | FIR against 5 people including Namo Sena President, Akhil Marathi Press Conference President for fraud on the pretext of sanctioning loans

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा