Pune Crime | 40 लाख रुपये घेऊन पत्नीस नांदवण्यास नकार देणाऱ्या पतीसह 5 जणांवर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पत्नीच्या माहेरच्या लोकांकडून वेगवेगळी कारणे सांगून लाखो रुपये घेऊन पत्नीला नांदवण्यास नकार देऊन तिला मारहाण (Beating) केल्याची घटना (Pune Crime) घडली आहे. ही घटना डोंबिवली इस्ट (Dombivli East) येथे 2014 ते जुन 2020 या कालावधीत घडली आहे. याप्रकरणी पीडित महिलेने पुण्यातील (Pune Crime) बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Bundgarden Police Station) फिर्याद दिली आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी पतीसह पाच जणांवर गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

 

पती टोनी नारायण परमार (वय-34), नणंद रुपल मेहुल वाघेला, मेहुल वाघेला, सासु नर्मदा नारायण परमार,
सासरे नारायण मंगलदास परमार यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी 34 वर्षीय पीडित महिलेने बंडगार्डन पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि.17) फिर्याद दिली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचे टोनी परमार याच्यासोबत 2014 मध्ये लग्न झाले होते.
लग्नानंतर आरोपी पती आणि सासरच्या लोकांनी पीडित महिलेच्या आई-वडील आणि भावाला वेगवेगळी कारणे देऊन 35 ते 40 लाख रुपये घेतले.
तसेच मुलाच्या आजरपणाची (child illness) कारण सांगत पैसे घेतले. पैसे घेऊनही आरोपींनी महिलेला शिवीगाळ करुन मारहाण केली.
सततच्या त्रासाला वैतागून पीडित महिलेने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद (Pune Crime) दिली. पुढील तपास बंडगार्डन पोलीस करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | FIR against 5 persons including husband for refusing to bathe his wife for Rs 40 lakh

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

ST Workers Strike | संप करणार्‍या एसटी कर्मचाऱ्यांवर 20 डिसेंबरपर्यंत मेस्मा नाही – अनिल परब

Ramdas Kadam | ‘अनिल परब हे खरे ‘गद्दार’, शपथ घेऊन सांगतो…’, रामदास कदम यांचा अनिल परब यांच्यावर घणाघात

Anti Corruption Bureau Pune | पिंपरी चिंचवड महापालिकेतील दोन लिपीक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Anti Corruption Bureau | 1 रुपया हुंडा घेऊन सर्वांकडून पाठ थोपटून घेणारा नार्कोटिक्स विभागातील पोलीस निरीक्षक 2 लाखांची लाच घेताना अँटी करप्शनच्या जाळ्यात