Pune Crime | सिंहगड रोड परिसरात महिलेला अश्लील शिवीगाळ करत मारहाण, विनयभंग करणाऱ्या 7 जणांवर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पत्र्याच्या शेडची तोडफोड करुन महिलेला अश्लील शिवीगाळ (Obscene Swearing) करुन महिलेला आणि तिच्या मुलाला बेदम मारहाण (Beating) करत विनयभंग (Molestation) केल्याची घटना पुण्यातील (Pune Crime) सिंहगड रोड परिसरात (Sinhagad Road Area) घडली आहे. हा प्रकार नोव्हेंबर 2021 मध्ये घडला आहे. याबाबत पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी (Pune Police) सात जणांवर गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

 

याबाबत सिंहगड रोड परिसरात राहणाऱ्या 50 वर्षाच्या महिलेने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) फिर्याद दिली आहे. महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी श्रीकांत दोडमणी (Srikant Dodmani) आणि त्यांच्या इतर पाच ते सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पीडित महिलेने दिलेल्या तक्रार अर्जाची चौकशी करुन पोलिसांनी शुक्रवारी (दि.31 मार्च) गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी यांचा प्लॉट शेजारी शेजारी आहे. घटनेच्या दिवशी आरोपी आणि त्याच्या इतर साथिदारांनी जागेच्या कारणावरुन महिलेच्या पत्र्याच्या शेडची तोडफोड करत असताना पीडित महिलेने आणि त्यांच्या मुलाने याबाबत आरोपींकडे विचारणा केली. त्यावेळी आरोपींनी महिलेला आणि त्यांच्या मुलाला अश्लील शिवीगाळ करत लाथा बुक्क्यांनी आणि लाकडी दांडक्याने मारहाण करुन महिलेचा विनयभंग केला.

 

आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी पत्र्याच्या शेडमधील सामान बाहेर आणून जाळले.
तसेच महिलेचे संसार उपयोगी साहित्य जबरदस्तीने टेम्पोत भरुन घेऊन निघून गेले.
आरोपींनी 65 हजार रुपयांचे सामान जबदस्तीने घेऊन गेले, असे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास सिंहगड रोड पोलीस करीत आहेत.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा 

 

Web Title :- Pune Crime | FIR against 7 persons for indecently assaulting and beating a woman in Sinhagad Road area

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा