Pune Crime | पुण्यात पोलीस उपनिरीक्षकाकडून 25 लाखाची खंडणी उकळणाऱ्या RTI कार्यकर्त्यासह 7 जणांवर FIR; प्रचंड खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | अतिवरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे वारंवार खोटे तक्रार अर्ज करुन पोलीस उपनिरीक्षकाला निलंबित केल्यानंतर पोलीस उपनिरीक्षकाकडे Police Sub Inspector (PSI) 50 लाखाची खंडणी (Extortion Case)  मागून 25 लाख रुपये खंडणी घेणाऱ्या माहिती अधिकार कर्यकर्ता सुधीर आल्हाट  (RTI Activist Sudhir Alhat) याच्यासह अर्चना समुद्र (Archana Samudra), रोहन समुद्र (Rohan Samudra), दिनेश समुद्र (Dinesh Samudra), जितु भाऊ (Jitu Bhau), आण्णा जेऊर (Anna Jeur) आणि मनिषा धारणे (Manisha Dharane Kothrud) यांच्यावर कोथरुड पोलीस ठाण्यात (Kothrud Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी एका महिलेकडे 50 लाखाची  खंडणी (Ransom Case) मागितल्या (Pune Crime) प्रकरणी सुधीर आल्हाट याला गुन्हे शाखेने (Pune Police Crime Branch) अटक (Arrest) केली होती.

 

याबाबत पोलीस उपनिरीक्षक संतोष सोनवणे (PSI Santosh Sonawane) यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी सुधीर आल्हाट (रा. रामांचल बिल्डिंग, शिवाजीनगर), अर्चना समुद्र, रोहन समुद्र, दिनेश समुद्र (तिघे रा. कोथरुड), जितु भाऊ, आण्णा जेऊर आणि मनिषा धारणे (रा. कोथरुड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संतोष सोनवणे यांच्याकडे आरोपी दिनेश समुद्र व इतरांनी 12 लाखाची फसवणूक (Cheating Case) केल्याच्या गुन्ह्याचा तपास (Investigation) होता. आरोपी हे अनेक दिवस येरवडा कारागृहात (Yerwada Jail) होते. दरम्यान, सुधीर आल्हाट याने वकील देऊन त्याला जामीन (Bail) मिळवून दिला. फिर्यादी सोनवणे यांनी दिनेश समुद्र याला गुन्ह्यात मदत केली नाही म्हणून धमकी (Threat) देण्यास सुरुवात केली. फिर्यादी यांनी सुरुवातीला याकडे दुर्लक्ष केले. मात्र आल्हाट याने वरिष्ठांकडे वारंवार खोटे तक्रार अर्ज केल्याने फिर्यादी यांना निलंबित (Suspended) करण्यात आले. (Pune Crime)

यानंतर आल्हाट याने आतापर्यंत 32 अधिकाऱ्यांना निलंबित केल्याचे सांगून तुम्हाल बडतर्फ करण्याची ऑर्डर लवकरच निघणार असल्याची धमकी दिली. त्यामुळे फिर्यादी सोनवणे यांनी पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर पावले (Dnyaneshwar Pavle) यांनी आल्हाट याची भेट घेतली. त्याच्या सांगण्यावरुन अर्चना समुद्र व रोहन समुद्र यांची भेट घेतली असता त्यांनी 50 लाख रुपये खंडणी मागितली. त्यानंतर 25 लाखावर तडजोड झाल्यानंतर 7 नोव्हेंबर 2021 रोजी त्यांनी आरोपींना 25 लाख रुपये दिले.

 

दरम्यान, एका महिलेच्या फिर्यादीवरुन सुधीर आल्हाट व इतरांवर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली होती.
यानंतर सोनवणे यांनी न्यायालयात (Court) दाद मागीतली.
न्यायलयाच्या आदेशावरुन पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला.
पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप (Senior Inspector of Police Mahendra Jagtap) करीत आहेत.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा 

 

Web Title :- Pune Crime | FIR against 7 persons, including RTI activist sudhir alhat for extorting Rs 25 lakh from Sub Inspector of Police (PSI) in Pune Huge excitement

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा