Pune Crime | शाळेतील मुलाचा लैंगिक छळ करणाऱ्या माजी मुख्याध्यापकासह दोन धर्मगुरुंवर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | शाळेतील मुलाचा लैंगिक छळ (Sexual Harassment) केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका शाळेच्या माजी मुख्याध्यापकासह (Principal) तिघांच्या विरोधात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. तसेच शाळकरी मुलाच्या लैंगिक अत्याचार प्रकरणात संबंधित मुख्याध्यपकाविरुद्ध कारवाई न केल्या प्रकरणी पुणे आणि मुंबईतील (Mumbai) दोन धर्मगुरु विरुद्ध (Religious Leader) गुन्हा (FIR) दाखल (Pune Crime) करण्यात आला आहे.

याबाबत सामाजिक कर्यकर्ते मारुती साहेबराव भापकर Maruti Sahebrao Bhapkar (वय-52 रा. चिंचवड) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. या प्रकाराबाबत मुलाच्या आई-वडिलांनी तक्रार केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुख्याध्यापक आणि पीडित मुलाचे आई-वडिल एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपी मुलाच्या घरी गेला होता. त्यावेळी मुलाचे आई-वडिल बाहेर गेले होते. या संधीचा फायदा घेत आरोपीने मुलासोबत गप्पा मारल्यानंतर त्याला खोलीत नेऊन त्याच्यासोबत अश्लील कृत्य केले. (Pune Crime)

मुलाने त्याच्यासोबत घडलेला सर्व प्रकार आई-वडिलांना सांगितला.
त्यांतर मुलाचे आई-वडील याचा जाब विचारण्यासाठी आरोपीकडे असता त्याने मी कोणाला घाबरत नाही असे सांगितले.
यानंतर पीडित मुलाच्या आई-वडिलांनी पुणे आणि मुंबई येथील धर्मगुरुंकडे मुख्याध्यापकाची तक्रार केली.
परंतु त्यांनी याची दखल घेतली नसल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. मुलावर लैंगिक अत्याचार केल्याचा गुन्हा वानवडी पोलीस ठाण्यात (Wanavadi Police Station) दाखल झाला होता. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुशील ढमरे (PSI Sushil Dhamre) करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | FIR against former headmaster and two clerics for sexually harassing school boy

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Politics | पेंग्विनने खुप प्रसिद्धी दिली…तुम्ही पेंग्विन सेना बोलत रहा, आदित्य ठाकरेंचा शिंदे गट आणि भाजपाला टोला

World Table Tennis Championships | जागतिक टेबल टेनिस स्पर्धेत भारतीय संघाची विजयी सुरुवात, उझबेकिस्तानचा केला पराभव