Pune Crime | पुण्यातील बिल्डरकडे 65 लाखाची खंडणी मागणाऱ्या कुख्यात गजानन मारणे टोळीतील रुपेश मारणेसह 4 जणांवर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुण्यातील बिल्डरकडे (Builder In Pune) 65 लाखाची खंडणी (Extortion) मागणाऱ्या सराईत गुन्हेगार रुपेश मारणे (Rupesh Marne) याच्यासह चार जणांवर वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात (Warje Malwadi Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) खंडणी विरोधी पथक दोनेने (Anti Extortion Cell, Pune) रुपेश मारणे याच्यासह चार जणांवर 386, 387 महाराष्ट्र सावकारी अधिनियम (Maharashtra Moneylending Act) कलम 39, 45 अन्वये गुन्हा (FIR) दाखल करण्यात (Pune Crime) आला आहे.

 

उमेश प्रसाद वाफगावकर Umesh Prasad Vafgaonkar (रा. यशराज अपार्टमेंट, तापोधम सोसायटी, वारजे पुणे), नितीन तुकाराम ननावरे Nitin Tukaram Nanavare (वय 41, फ्लॅट नंबर 305 विंड बिल व्हिलेज, बावधन पुणे), अनिल अंबादास लोळगे Anil Ambadas Lolge (वय 40, 105 गोल्डफिनच पेठ, नवी पेठ सोलापूर) आणि रुपेश कृष्णराव मारणे (वय 38, रा- नऊ एकता कॉलनी शास्त्रीनगर, कोथरूड पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

 

याबाबत कोथरूडमध्ये राहणाऱ्या व्यक्तीने खंडणी विरोधी पथक दोनकडे तक्रारी अर्ज केला आहे. (Pune Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रमेश गवळी यांनी बांधकाम व्यवसायासाठी (Construction Business) उमेश वाफगावकर, रुपेश मारणे, अनिल लोळगे, नितिन ननावरे यांचेकडून 1 कोटी 85 लाख रुपये घेतले होते. त्याबदल्यात फिर्यादी यांनी 2 कोटी 30 लाख रुपये दिले आहेत. आरोपींनी आणखी 65 लाख रुपये मागणी केली. तसेच रुपेश बारणे याच्या सांगण्यावरुन फिर्यादी यांच्या कर्वेनगर येथे बांधकाम केलेले 12 फ्लॅट करार करुन सिक्युरिटी म्हणून घेतले. तसेच ते फ्लॅट विक्री करण्यास आरोपींनी अडथळा निर्माण करुन फ्लॅट हडपण्याचा प्रयत्न करुन धमकावल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. फिर्यादी यांनी दिलेल्या अर्जाची चौकशी केली असता आरोपींनी खंडणी मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
पोलीस सह आयुक्त संदीप कर्णीक (Jt CP Joint Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 2 नारायण शिरगावकर (ACP Narayan Shirgaonkar)
यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक – 2 चे पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे (Police Inspector Balaji Pandhare) यांनी गुन्हा दाखल केला आहे.

 

Web Title :- Pune Crime | FIR Against Gangster Rupesh Marne At Warje Malwadi Police Station

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा