Pune Crime | शेअर मार्केटमधून मुद्दलासह दीडपट रक्कम परत करण्याच्या अमिषाने सव्वा कोटींची फसवणूक, जितेंद्र मालखेडेवर FIR

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | शेअर मार्केटमध्ये (Stock Market) गुंतवलेल्या (Investment) रक्कमेसह दीडपट परतावा देण्याच्या आमिषाने (Lure) दोघांची सव्वा कोटी रुपयांची फसवणूक (Cheating Case) केल्याचा प्रकार समोर (Pune Crime) आला आहे.
हा प्रकार 19 ऑक्टोबर 2020 ते 25 फेब्रुवारी 2021 या कालावधीत पिंपळे सौदागर (Pimple Saudagar)
येथील ट्रेडको सर्व्हिसेसच्या ऑफिसमध्ये घडला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी (Pune Police) गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

 

जितेंद्र सुखलाल मालखेडे Jitendra Sukhlal Malkhede (वय – 38 रा. गणेश मंदिराजवळ, निगडी प्राधिकरण – Nigdi Pradhikaran) आणि त्याच्या इतर साथीदारांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत निलेश भालचंद्र जगताप Nilesh Bhalchandra Jagtap (वय – 42 रा. फ्लॅट नं.11 गणेश कॉम्प्लेक्स, आंबेगाव बुद्रुक – Ambegaon Budruk) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात (Sangvi Police Station) फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी व त्यांचे नातेवाईक सूर्यकांत काळे (Suryakant Kale)
यांना शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यास एकूण रकमेवर मुद्दल रकमेसह दीडपट परतावा देण्याचे आमिष दाखवले.
यासाठी फिर्यादी व त्यांच्या नातेवाईक मित्राकडून 1 कोटी 74 लाख 80 हजार रुपये घेतले.
त्यानंतर ठरल्याप्रमाणे तीन महिन्यात गुंतवलेल्या रकमेवर दीडपट परताव्याची रक्कम म्हणून फिर्यादी यांना 37 लाख 80 हजार 121 रुपये तर फिर्यादी यांचे नातेवाईक काळे यांना 13 लाख 55 हजार रुपये असे एकूण 51 लाख 35 हजार 121 रुपये परत दिले.

 

दरम्यान, फिर्यादी यांनी उर्वरीत रक्कम मागितली असता आरोपीने उडवाउडवीची उत्तरे देत भेट टाळली.
आरोपीने फिर्यादी व त्यांचे नातेवाईक काळे या दोघांची 1 कोटी 23 लाख 879 रुपयांची आर्थिक फसवणूक केली.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक तानाजी भोगम (API Tanaji Bhogam) करीत आहेत.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा 

 

Web Title :- Pune Crime | FIR against Jitendra sukhlal Malkhede for fraud of Rs 1.25 crore in
pimple saudagar fraud cheating case sangvi police station pimple saudagar

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा