Pune Crime | पुण्यातील मनसेचे नेते वसंत मोरे आणि साईनाथ बाबर यांच्यावर गुन्हा दाखल; जाणून घ्या प्रकरण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – FIR Against MNS Leader Vasant More And Sainath Babar | पुण्यातील मनसे नेते वसंत मोरे (MNS Leader Vasant More) आणि शहराध्यक्ष साईनाथ बाबर (City President Sainath Babar) याच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivajinagar Police Station) गुन्हा दाखल (Pune Crime) करण्यात आला आहे. पुणे मनसेच्या (Pune MNS) वतीने महानगरपालिकेत (Pune Municipal Corporation (PMC) आंदोलन (Agitation) केले होते. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान दोन्ही नेत्यांना पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. (Pune Crime)

 

पुणे मनसेच्या वतीने 17 मार्च रोजी पाणी (Water) प्रश्नावरुन आंदोलन करण्यात आले होते. पुणे महानगरपालिकेच्या आवारात कोणतेही आंदोलन करण्यास मनाई असताना पुणे मनसेच्या वतीने पालिकेच्या आवारात आंदोलन केले. याप्रकरणी तेथील सुरक्षारक्षकाने लेखी तक्रार दिली होती. त्यानुसार वसंत मोरे आणि शहराध्यक्ष साईनाथ बाबर आणि त्यांच्यासोबत असलेल्या 100 ते 125 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सात कलमांतर्गत हे गुन्हे दाखल केले आहेत. (Pune Crime)

 

परवानगी नसताना वसंत मोरे आणि साईनाथ बाबर यांनी महापालिकेच्या तिसऱ्या मजल्यावर गेले आणि त्याठिकाणी आंदोलन सुरु केले. त्यानंतर काही कार्यकर्ते आणि पदाधिकारी सर्व मिळून 100 ते 125 जणांनी पालिकेच्या गेटवर आंदोलन करत सुरक्षारक्षकांना (Security Guards) ढकलून दिले आणि पालिकेच्या आवारात प्रवेश केला. त्यामुळे गेटची काडीही तुटल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.

 

Web Title :- Pune Crime | FIR Against MNS Leader Vasant More And Sainath Babar In Shivaji Nagar Police Station

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pankaja Munde On Ketaki Chitale Topic | केतकी चितळे वादग्रस्त पोस्ट प्रकरणी पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया, म्हणाल्या – ‘पवार साहेबांनी…’

 

EPFO Update | UAN मेंबर पोर्टलवर प्रोफाईल पिक्चर अशाप्रकारे करू शकतात अपलोड, याशिवाय होणार नाही ई-नॉमिनेशन

 

Pune Crime | मोबाईलवर पॉर्न व्हिडिओ दाखवून 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार; नराधमास 20 वर्षे सक्तमजुरी