Pune Crime | ‘अप्पर’ची पोर गुन्हेगार नावाने व्हिडिओ व्हायरल करणार्‍या ‘रॅपसिंगर’वर FIR

पुणे : Pune Crime | “अप्पर”ची पोर गुन्हेगार (Criminal) अशा मजकूराची अश्लिल वाक्य वापरलेला व्हिडिओ व्हायरल करणार्‍या विरुद्ध बिबवेवाडी पोलिसांनी (Pune Police) गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

ऋतिक मेहबुब शेख (रा. काकडे वस्ती, अप्पर इंदिरानगर) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. शेख हा स्वत:ला रॅपसिंगर (Rapsinger) म्हणवून घेतो.

याप्रकरणी खंडणी विरोधी पथकाचे पोलीस शिपाई प्रदीप गाडे यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात (Bibvewadi Police Station) फिर्याद (गु.रजि. नं. २०२/२२) दिली आहे. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला.

त्यात तुझ्या घरात नाय गहू, म्हणे एल सी डी घेऊ,
तुझी जागीरदारी, हा तुझी भाईगिरी,
तुझ्या .. खाली ठेव इकडे आला तर खाशील मार,
अप्परची पोर गुन्हेगार
घेत्याल बिलेड करत्याल, … वर वार,
तू मेला मी घेऊन येईल हार,
मी घेणार नाही माघार,
कारण माझा हुर मला देतोय आधार,
ए … बाला, तुझी नाही माझ्यासमोर लायकी,
मी नी पायात घातली नायकी,
तेरी बहिण मेरी भाई की,
तेरे को फिकर काय की,
मी पोरगा जरा सनकी,
मी सुनता मन की,
तुझा हुर मला देतोय धमकी.

Advt.

अशा मजकुराची अश्लिल वाक्य उच्चारुन आक्षेपार्ह व्हिडिओ बनवून तो व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करुन सामाजिक शांतता बिघडविण्याचा प्रयत्न केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक हिवरकर तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | FIR against ‘Rapsinger’ who went viral with the name of Upper child criminal

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | महिला पोलीस कर्मचार्‍याला अश्लिल शिवीगाळ करीत चप्पलने मारहाण

Sanjay Raut | सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न द्या – संजय राऊत