Pune Crime | पुण्यातील सतिश बोरा अँड असोसिएट्सचे सतिश बोरा, सुजाता बोरा, पंकज बोरा यांच्यावर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुण्यातील सतीश बोरा अँड असोसिएट्स (Satish Bora & Associates) यांच्या वारजे (Warje) येथील लिबेरो गृह प्रकल्पात (Libero Home Project) खरेदी केलेल्या फ्लॅटचा ताबा वेळेवर न देता विलंबाने दिला. तसेच ब्रोशरमध्ये (Brochure) दिलेल्या कोणत्याही सुविधा न देता फ्लॅटधारकाची फसवणूक (Fraud) केल्याचा प्रकार (Pune Crime) उघडकीस आला आहे. याप्रकरणी सतीश बोरा अँड असोसीएट्सच्या तीन संचालकांवर (Directors) वारजे पोलीस ठाण्यात (Warje Police Station) महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट अ‍ॅक्ट Maharashtra Ownership Flats Act (मोफा – MOFA) अंतर्गत गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

 

मे. सतीश बोरा अँड असोसीएट्सचे सतीश कांतीलाल बोरा (Satish Kantilal Bora), सुजाता सतीश बोरा (Sujata Satish Bora), पंकज सतीश बोरा Pankaj Satish Bora (सर्व रा. रचना अव्हेन्यु, एफसी रोड, सागर आर्केड, डेक्कन जिमखाना – Deccan Gymkhana) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत प्रल्हाद दामोदर सातव Pralhad Damodar Satav (वय – 70) यांनी वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रल्हाद सातव यांनी सतीश बोरा अँड असोसीएट्सच्या वारजे येथील लिबेरो गृह प्रकल्पात 6 ऑक्टोबर 2014 रोजी फ्लॅट बुक केला होता.
सातव यांनी खरेदीखत करुन देताना 20 टक्के आगाऊ रक्कम भरलेली होती.
त्यांना फ्लॅटचा ताबा 31 डिसेंबर 2015 रोजी देण्याचे लिहून देण्यात आले होते.
मात्र प्रत्यक्षात त्यांना 17 डिसेंबर 2021 रोजी फ्लॅटचा ताबा दिला. फ्लॅटचा ताबा देण्यास आरोपींनी सहा वर्षे उशीर केला. (Pune Crime)

फ्लॅट सहा वर्षे उशिराने देऊन देखील आरोपींनी ब्रोशरमध्ये दिलेल्या कोणत्याही सुविधा (Facility) दिल्या नाहीत.
तसेच फ्लॅट धारकांकडून आगाऊ घेतलेले पैसे बँकेत न ठेवता त्याचा हिशोब ठेवला नाही.
सदनिका घेतल्यानंतर चार महिन्याच्या आत कंडोमिनियम नोंदणी (Condominium Registration) करण्यासाठी संबंधीत कार्यालयात अर्ज करावा लागतो.
मात्र आरोपींनी तसे केले नाही. याशिवाय दस्तावर अधिकाऱ्याची सही न घेता, चुकीचा बनावट दस्त तयार करुन फिर्यादी यांची फसवणूक केली.
फिर्यादी यांनी वारजे पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज केल्यानंतर पोलिसांनी अर्जाची चौकशी करुन सतिश बोरा अँड असोसिएट्सच्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा 

 

Web Title :- Pune Crime | FIR against Satish Bora Sujata Bora Pankaj Bora of Satish Bora & Associates in Pune

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा