Pune Crime | जनावरांची बेकायदा वाहतूक करणाऱ्यांवर FIR, जनवारांसह 17 लाखांचा मुद्देमाल जप्त

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | जनावरांची बेकायदा वाहतूक (Illegal Animal Transport) करणाऱ्या वाहनांवर कारवाई करुन 12 देशी जातीचे खोंडे आणि वाहने जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई पुणे जिल्ह्यातील (Pune Crime) इंदापूर पोलीस ठाण्याच्या (Indapur Police Station) हद्दीत करण्यात आली आहे. या कारवाईत पोलिसांनी 17 लाख 20 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करुन दोघांवर गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

 

सागर शांताराम पुरकर Sagar Shantaram Purkar (वय-35), संदिप गंगाधर पानगव्हाणे Sandeep Gangadhar Pangavhane (वय-45 दोघे रा. निमगाव वाकडा, ता. निफाड जि. नाशिक (Nashik) यांच्यावर प्राण्यांचा छळ अधिनियम 1960 (Animal Cruelty Act 1960) कलम 11(1) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई अकलुज बायपास रोडवर (Akluj Bypass Road) करण्यात आली. (Pune Crime)

आरोपी सागर पुरकर याच्या ताब्यातील अशोक लेलँड (Ashok Leyland) गाडीत (एमएच 45 एएफ 2530)
आणि संदीप पानगव्हाणे याच्या ताब्यातील महिंद्रा पिकअप Mahindra Pickup (एमएच 15 एएफ 1171)
मधून इंदापूर गावच्या हद्दीतीत अकलुज बायपास रोडने जनावरांची वाहतूक करताना आढळून आले.
आरोपींनी दोन्ही वाहनामध्ये क्षमतेपेक्षा जास्त जनावरे दाटीवाटीने भरून त्यांच्या चारा पाण्याची कोणतीही व्यवस्था न करता निर्दयतेने त्यांची वाहतुक करत असतांना इंदापूर पोलीस ठाण्याच्या पथकास आढळले.
पोलिसांनी कारवाई करुन 1 लाख 20 रुपये किमतीची 12 देशी जातीची खोंडे,
8 लाखाचां महिंद्रा पिकअप आणि 8 लाखांचा अशोक लेलँड कंपनीची गाडी
असा एकूण 17 लाख 20 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

 

Web Title : Pune Crime | FIR against those who smuggled animals confiscated goods worth Rs 17 lakh including animals

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे हि वाचा