पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | दरमहा 15 टक्के व्याजाने घेतलेले 1 लाख रुपये व्याजासह परत केल्यानंतर देखील जास्तीचे पैसे मागणाऱ्या खासगी सावकार आणि त्याच्यासाठी वसुली करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हे शाखेच्या (Pune Crime Branch) खंडणी विरोधी पथक दोनने (Anti Extortion Cell) गुन्हा (FIR) दाखल केला आहे. आरोपींनी तक्रारदार यांच्याकडून 1 लाखाच्या मोबदल्यात 4 लाख 86 हजार रुपये घेऊन आणखी पैशांची मागणी केली आहे.
रवी नरसिंग पवार Ravi Narsingh Pawar (वय – 42 रा. लक्ष्मीनगर, हडपसर, पुणे) व अशोक वसंत ठाकरे Ashok Vasant Thackeray (वय- 27 रा. वैदुवाडी, हडपसर, पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) आयपीसी 386, 387, 452, 341, महाराष्ट्र सावकारी कायदा अंतर्गत (Maharashtra Moneylending Act) गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी आणि त्यांच्या मित्राने मे 2019 मध्ये रवी पवार याच्याकडून एक लाख रुपये प्रति महिना 15 टक्के व्याज दराने पैसे घेतले होते. एक लाखाच्या मोबदल्यात फिर्यादी यांनी रवी पवार याला 3 लाख 30 रुपये रोख तर अशोक ठाकरे याला 1 लाख 56 हजार रुपये ऑनलाइन असे एकूण 4 लाख 86 हजार रुपये दिले. आरोपींनी फिर्यादी यांच्याकडे आणखी 40 हजार रुपयांची मागणी केली. तसेच पैसे दिले नाहितर मुलाला उचलून नेऊन (Kidnapping) त्याचे हात पाय तोडण्याची धमकी दिली. याशिवाय फिर्यादी यांना देखील जीवे ठार मारण्याची धमकी (Threats to Kill) दिली. फिर्यादी यांनी खंडणी विरोधी पथक दोन कडे तक्रार अर्ज केला. पथकाने चौकशी करुन आरोपींविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास हडपसर पोलीस करीत आहेत.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), पोलीस सह आयुक्त संदीप कर्णीक (Jt CP Joint Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 2 नारायण शिरगावकर (ACP Narayan Shirgaonkar)
यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक – 2 चे पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे (Police Inspector Balaji Pandhare),
सहायक पोलीस निरीक्षक चांगदेव सजगणे (API Changdev Sajjanne), पोलीस उपनिरीक्षक मोहनदास जाधव (PSI Mohandas Jadhav),
श्रीकांत चव्हाण (PSI Shrikant Chavan), पोलीस अंमलदार विजय गुरव, प्रदिप शितोळे, शैलेश सुर्वे, राहुल उत्तरकर,
विनोद साळुंके, अनिल मेंगडे, संग्राम शिनगारे, सचिन अहिवळे, सैदोबा भोजराव, सुरेंद्र साबळे, अमोल पिलाणे,
चेतन आपटे, चेतन शिरोळकर, प्रदिप गाडे, सुरेंद्र साबळे, पवन भोसले, चेतन शिरोळकर, प्रदिप गाडे, आशा कोळेकर यांनी ही कारवाई केली.
Web Title :- Pune Crime | FIR by Anti-Extortion Squad-2 against moneylender and collector charging interest at 15 percent per month
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Arvind Sawant | मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासकीय कारभाराची देखील चौकशी झाली पाहिजे – अरविंद सावंत