Pune Crime | नगरसेवकाकडे 25 लाख रुपये खंडणी मागणारा RTI कार्यकर्ता जितेंद्र भोसलेवर गुन्हे शाखेकडून FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation) नगरसेवकाला (Corporator) जीवे ठार मारण्याची (Threats to Kill) तसेच अ‍ॅट्रॉसिटीच्या (Atrocity) खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन 25 लाख रुपये खंडणी (Extortion) मागणाऱ्या आर.टी.आय. कार्यकर्त्यावर (RTI Activist) गुन्हे शाखेच्या (Crime Branch) खंडणी विरोधी पथक दोनने (Anti Extortion Cell) गुन्हा (FIR) दाखल केला आहे. जितेंद्र अशोक भोसले Jitendra Ashok Bhosle (रा. विमाननगर, पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आर.टी.आय. कार्यकर्त्याचे नाव आहे.

आरोपी जितेंद्र भोसले हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापुर्वी खंडणीचे 3, व इतर 3 असे सहा गुन्हे दाखल
आहेत. आरोपी हा माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून काम करत असून त्याने फिर्यादी नगरसेवक व त्यांच्या पत्नी
विरोधात बेकायदेशीर बांधकाम (Illegal Construction) केल्याप्रकरणी नगरसेवक पद रद्द करण्यासाठी 2018-
19 पासून वेगवेगळ्या शासकिय कार्यालयात खोटे अर्ज केले आहेत.

दाखल केलेले अर्ज मागे घेण्यासाठी तसेच आगामी महापालिका निवडणुकीमध्ये (Municipal Election) सोशल मीडियाच्या माध्यमातून पत मलीन करण्याची धमकी देऊन 25 लाख रुपये खंडणी मागितली.
तसेच पैसे दिले नाहीतर जीवे मारण्याची व अ‍ॅट्रॉसिटीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत असल्याची तक्रार नगरसेवक यांनी गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक दोनकेडे केली आहे.
प्राप्त तक्रारीची चौकशी करुन गुन्हे शाखेने जितेंद्र भोसले याच्याविरुद्ध विमानतळ पोलीस ठाण्यात (Vimantal Police Station) आयपीसी 385, 387 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), पोलीस सह आयुक्त संदीप कर्णीक
(Jt CP Joint Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे
(Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge), सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 2 नारायण
शिरगावकर (ACP Narayan Shirgaonkar) यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक – 2 चे पोलीस
निरीक्षक बालाजी पांढरे (Police Inspector Balaji Pandhare), सहायक पोलीस निरीक्षक चांगदेव सजगणे
(API Changdev Sajjanne), पोलीस उपनिरीक्षक मोहनदास जाधव (PSI Mohandas Jadhav), श्रीकांत
चव्हाण (PSI Shrikant Chavan) पोलीस अंमलदार विजय गुरव, प्रदिप शितोळे, शैलेश सुर्वे, राहुल उत्तरकर,
विनोद साळुंके, अनिल मेंगडे, संग्राम शिनगार, सचिन अहिवळे, सैदोबा भोजराव, सुरेंद्र साबळे, अमोल पिलाणे, चेतन
आपटे, चेतन शिरोळकर, प्रदिप गाडे, किशोर बर्गे, पवन भोसले, रवि सपकाळ व महिला पोलीस अंमलदार आशा
कोळेकर, रुपाली कर्णवर यांच्या पथकाने केली.

Web Title :- Pune Crime | FIR by pune police Crime Branch against RTI activist Jitendra Bhosale who demanded Rs 25 lakh extortion from the corporator

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Rupali Patil On Chandrasekhar Bawankule | राष्ट्रवादीच्या रूपाली पाटील यांचा भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंवर निशाणा, म्हणाल्या -’ज्याला तिकीट मिळालं नाही तो…’

Gulabrao Patil | ‘आजपर्यंत एक नेता म्हणून इज्जत ठेवली, नाहीतर…’ गुलाबराव पाटलांचा आदित्य ठाकरेंना थेट इशारा (व्हिडीओ)

Rashmi Bagal | रश्मी बागल सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात जाणार? त्यांच्यावर होता उध्दव ठाकरेंचा ‘विश्वास’

CM Eknath Shinde – MLA Sanjay Shirsat | मुख्यमंत्री निवास ’वर्षा’वरील स्नेहभोजनाला एकनाथ शिंदे गटाचे औरंगाबादचे आ. संजय शिरसाट जाणार नाहीत; चर्चांना उधाण