Pune Crime | NCP च्या महिलांना मारहाण करणार्‍या BJP च्या तिघा कार्यकर्त्यांवर मारहाण तसेच विनयभंग केल्याचा FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  – Pune Crime | केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Union Minister Smriti Irani) यांच्या हस्ते होणार्‍या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांना (NCP Woman Workers) मारहाण करुन पदर ओढून अश्लिल हातवारे (Obscene Gestures) करणार्‍या तिघांविरुद्ध डेक्कन पोलिसांनी (Deccan Police Station) विनयभंगाचा गुन्हा (Molestation Case) दाखल केला आहे. (Pune Crime)

भस्मराज तिकोणे Bhasmaraj Tikone (रा. कसबा पेठ – Kasba Peth), प्रमोद कोंढरे Pramod Kondhare (रा. नातूबाग – Natubaug) आणि मयुर गांधी Mayur Gandhi (रा. शुक्रवार पेठ – Shukrawar Peth) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. (Pune Crime)

याबाबत राष्ट्रवादीच्या एका महिला पदाधिकार्‍याने डेक्कन पोलीस ठाण्यात (Deccan Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ५७/२२) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी IPC ३५४, ३२३, ५०४, ५०६ आणि ३४ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

याबाबतची माहिती अशी, फिर्यादी या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी असून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचा बालगंधर्व रंगमंदिर (Bal Gandharva Rang Mandir: Pune) येथे कार्यक्रम होता. कार्यक्रम संपल्यानंतर त्यांना वाढत्या महागाई तसेच घरगुती गॅसच्या किंमती (LPG Gas Cylinder Price Hike) बाबत निवेदन देण्यासाठी साधारण सहा वाजता बालगंधर्व रंगमंदिरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही महिला भाजप कार्यकर्त्यांसह बाल्कनीत पोहचल्या. कार्यक्रम सुरु झाल्यानंतर तेथे असलेल्या भाजप कार्यकर्त्यांना त्या उपस्थित असल्याचे लक्षात आले. त्यांनी जोरजोरात घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यावेळी तेथे बंदोबस्त करीता उपस्थित असलेले पोलीस अधिकारी (Pune Police Officers) व कर्मचारी तेथे धावून गेले. तेव्हा भाजप पदाधिकार्‍यांनी हा कार्यक्रम भाजपा पक्षाचा असून राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचे येथे काय काम असे म्हणून यांना येथून बाहेर काढा, असे जोरजोरात ओरडण्यास सुरुवात केली.

त्यावेळी त्यांनी आम्ही मंत्री महोदयांना निवेदन देण्याकरीता आलो आहोत. निवेदन देऊन आम्ही परत जाणार आहोत, असे त्यांनी सांगितले. परंतु, भाजपा पदाधिकार्‍यांनी काही एक ऐकून घेतले नाही. पोलीस त्यांना बाहेर काढत असताना तेथे जमलेल्या भाजपाच्या एका भगव्या रंगाची टोपी घातलेल्या कार्यकत्याने फिर्यादी यांना हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच त्याचे शेजारी उभा असलेला भाजपाचा कार्यकर्ता प्रमोद कोंढरे यांनी गर्दीचा फायदा घेऊन फिर्यादी यांच्या साडीचा पदर ओढला व माझ्याकडे बघून अश्लिल हातवारे केले असे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. या प्रकारामुळे आपल्या मनात लज्जा उत्पन्न करुन आपला विनयभंग केला असे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे. तसेच त्यानंतर दुसर्‍या भाजपा कार्यकर्त्यांने फिर्यादी यांना मारण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी तो चुकविला.

 

त्यांच्या सोबत असलेल्या महिला सहकार्‍यांच्या डोक्याला लागले. धक्का बुक्कीमध्ये त्यांचे मंगळसुत्र तुटले आहे.
तेथून बाहेर येताना भाजपाचे पदाधिकारी मयुर गांधी व प्रमोद कोंढरे यांनी त्यांना अश्लिल भाषेत शिवीगाळ करीत यांना सोडू नका.
यांना ठेचून काढा, यांना आता बघून घेऊ, अशी धमकी दिली. पोलिसांनी त्यांना सुखरुपपणे डेक्कन पोलीस ठाण्यात आणले.
त्या ठिकाणी फिर्यादींना लो बीपीचा (Low BP) त्रास होत असल्याने पोलिसांनी त्यांना तात्काळ ससून रुग्णालयात
(Sasoon Hospital) पाठविले. वैद्यकीय उपचारानंतर त्यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली आहे.
डेक्कन पोलीस तपास करीत

Web Title : Pune Crime | FIR filed against three BJP workers for assaulting and molesting NCP women workers

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

PMC Integrated Command and Control Centre | शहर नियोजनासोबतच आपत्ती व्यवस्थापनासाठी महापालिकेने ‘इंटीग्रेटेड कमांड ऍन्ड कंट्रोल सेंटर’ ची केली स्थापना

 

Maharashtra Monsoon Updates | मान्सून आला..! महाराष्ट्रात ‘या’ दिवशी पावसाचं आगमन होणार – IMD

MLA Sangram Jagtap BMW Car Accident | राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या कारला भीषण अपघात

 

Pune Crime | पुण्यात केंद्रीय मंत्री स्मृती इराणींच्या कार्यक्रमात NCP महिला पदाधिकाऱ्याला मारहाण; BJP च्या तिघांवर ‘FIR’