Pune Crime | अ‍ॅट्रोसिटीच्या गुन्ह्यात अडविण्याची धमकी देऊन ६० लाखांची खंडणी मागणाऱ्या रुग्ण हक्क परिषदेच्या उमेश चव्हाणवर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | हॉस्पिटल विकत घेऊन त्यामधील मेडिकल स्टोअर (Medical Store), लॅब (Lab), उपहारगृह (Canteen) चालविण्याच्या बदल्यात लाखो रुपये घेतले. तरुणाला ब्लॅकमेल (Blackmail) करुन त्याच्या मालमत्तेवर महापालिकेने कारवाई न करण्यासाठी तसेच अ‍ॅट्रोसिटीसारख्या (Atrocity) गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन ६० लाख रुपयांची खंडणी (Ransom) मागण्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी (Kondhwa Police) रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश भगवानराव चव्हाण Umesh Bhagwanrao Chavan (वय ३५, रा. धानोरी), रुग्ण हक्क परिषेदच्या अध्यक्षा अपर्णा साठे Aparna Sathe (वय ३८, रा. नारायण पेठ) यांच्यावर खंडणीचा गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

 

याबाबत मोहसीन नबी खान Mohsin Nabi Khan (वय ३८, रा. साईबाबानगर, कोंढवा) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ९७९/२२) दिली आहे. हा प्रकार फिर्यादीच्या मालकीच्या हॉस्पिटलमध्ये व कॅम्पमधील ब्लु नाईल हॉटेलसमोरील (Blue Nile Hotel) इराणी हॉटेलमध्ये (Irani Hotel) २३ नोव्हेबर २०२१ ते २८ एप्रिल २०२२ दरम्यान घडला आहे. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेश चव्हाण याने फिर्यादीचे हॉस्पिटल विकत घेतले. चव्हाण व त्यांच्या सहकार्‍यांनी हॉस्पिटलची (Hospital) परवानगी नसताना वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रतिष्ठित लोकांना बोलावून हॉस्पिटलचे उद्घाटन केले. हॉस्पिटल सुरु केले. हॉस्पिटलच्या नावाने वेगवेगळ्या योजना तयार केल्या. शासकीय योजनांच्या नावावर लोकांकडून पैसे उकळले. हॉस्पिटलमधील मेडिकल स्टोअर, लॅब, उपहारगृह चालविण्याच्या बदल्यात लाखो रुपयांची अनामत रक्कम घेतली. महारजत बँक नावाने हॉस्पिटलमध्येच बँक सुरु केली.
छोट्या मोठ्या व्यावसयिकांकडून पैसे लाटून फिर्यादीने त्यास हॉस्पिटलच्या व्यवहाराविषयी विचारल्यावर उमेश चव्हाण व
त्याच्या सहकार्‍यांनी हॉस्पिटलच्या नावावर केलेल्या ५० ते ६० लाख रुपयांच्या गैरव्यवहाराचे पैसे फिर्यादीनेच द्यावेत,
यासाठी त्यांच्यावर दबाव टाकून धमक्या देऊ लागले. फिर्यादी व अनेकांची फसवणुक (Fraud Case) करुन पैसे बुडवले आहे.

 

फिर्यादीस वारंवार ब्लॅकमेल करुन फिर्यादीकडून त्यांच्या मालमत्तेवर महापालिकेमार्फत कारवाई न
करण्याकरीता ६० लाख रुपयांची मागणी केली.
फिर्यादी यांना वेळोवेळी जीवे मारण्याची व अ‍ॅट्रोसिटीसारख्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी
देऊन फिर्यादीकडे ६० लाख रुपयांची खंडणीची (Extortion Case) मागणी केली.
त्यांच्या तक्रारीची पोलिसांनी दखल न घेतल्याने फिर्यादी यांनी न्यायालयात धाव घेतली होती.
न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक तोरगल (Assistant Police Inspector Torgal) तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | FIR filed against Umesh Chavan of Patient Rights Council who threatened to stop the crime of atrocity and demanded an extortion Crime news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | डॉक्टरकडून 4 लाखाची खंडणी घेताना पत्रकारासह महिला गुन्हे शाखेच्या जाळ्यात

Pune Crime | हडपसरमधील रामटेकडी भागात टोळक्याची दहशत दोघांवर शस्त्राने वार

Maharashtra Congress | काँग्रेस आमदाराच्या दाव्याने खळबळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना अब्दुल सत्तारांपासून धोका!