Pune Crime | नर्‍हे येथील भुमकर चौकातील पानटपरी चालकाला पाईपाने मारहाण, तोडफोड करणाऱ्या तिघांवर सिंहगड रोड पोलिस ठाण्यात FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | एकमेकांकडे पाहण्यावरुन एका पानटपरी चालकाला लोखंडी पाईपाने बेदम मारहाण (Beating) करुन जखमी केले. तसेच पानटपरीची तोडफोड करुन नुकसान केल्याची घटना पुण्यातील (Pune Crime) नऱ्हे (Narhe) येथील भुमकर चौकात (Bhumkar Chowk) रविवारी (दि.27) रात्री साडे दहाच्या सुमारास घडली आहे. याबाबत जखमी (Injured) झालेल्या पानटपरी चालकाने मंगळवारी (दि. 29) सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) तक्रार दिली आहे. पोलिसांनी (Pune Police) तिघांविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

 

विवेककुमार नन्नेलाल वर्मा Vivek Kumar Nannelal Verma (वय – 21 रा. सिताई कॉर्नर, भुमकर चौक, नऱ्हे) असे जखमी झालेल्या पानटपरी चालकाचे नाव असून त्याने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी भिम उर्फ भिमशा चव्हाण (Bhim alias Bhimsha Chavan), व्यंकटेश पिनवलकर (Venkatesh Pinwalkar), किरण शिंदे (Kiran Shinde) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी हे तोंडओळखीचे आहे.
रविवारी रात्री फिर्यादी त्यांच्या मातोश्री पान शॉप मध्ये काम करत होते.
त्यावेळी आरोपी त्याठिकाणी आले. भिमशा चव्हाण याने फिर्यादी यांना ‘तु माझ्याकडे असा का पाहतो’ असे म्हणत वाद घालून शिवीगाळ केली.
तसेच लोखंडी पाईपने पानटपरीचे काऊंटर (Counter), शटर (Shutter) आणि एलईडी टिव्हीवर (LED TV) मारुन तोडफोड केली.
तसेच फिर्यादी यांच्या डोक्यात लोखंडी पाईप मारुन जखमी केले. पुढील तपास पोलीस हवालदार गवळी (Police Constable Gawli) करीत आहेत.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा 

 

Web Title :- Pune Crime | FIR filed at Sinhagad Road Police Station against three persons Narhe Bhumkar Chowk Incident

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा