Pune Crime | कोर्ट मॅरेज करुन विधीवत लग्नासाठी हुंड्याची मागणी करुन नांदविण्यास दिला नकार; हडपसर पोलीस ठाण्यात FIR

पुणे : Pune Crime | कोर्ट मॅरेज (Court Marriage) करुन विधीवत लग्नासाठी हुंड्याची मागणी करुन नांदविण्यास नकार देणार्‍या पतीसह चौघांवर हडपसर पोलिसांनी (Pune Police) गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

याप्रकरणी एका तरुणीने हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १४२७/२२) दिली आहे. त्यानुसार पती निरंजन थोरले, सासु कल्पना थोरले, सासरे हुवाप्पा थोरले आणि नंणद यांच्यावर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार गोंधळेनगर (Gondhalenagar, Hadapsar) येथे १८ ऑक्टोबर २०२२ रोजी घडला होता.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निरंजन थोरले हा एका शास्त्रज्ञांच्या हाताखाली काम करीत आहे.
त्याने फिर्यादी यांनी आपण अगोदर कोर्ट मॅरेज करुन नंतर विधीवत लग्न करु असे सांगितले.
त्यानुसार १८ ऑक्टोबर २०२२ रोजी त्यांनी कोर्ट मॅरेज केले.
दरम्यान, निरंजन याला पुढील शिक्षणासाठी ऑस्ट्रेलिया येथे जायचे होते. त्यासाठी त्याने विधीवत लग्न करायचे असेल तर हुंड्याची मागणी केली. फिर्यादी या सासरी गेल्या असताना त्यांना नांदवून घेण्यास नकार दिला. त्यामुळे आपली फसवणुक (Cheating Case) झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक सुवर्णा गोसावी (Sub-Inspector of Police Suvarna Gosavi) अधिक तपास करीत आहेत.

Web Title :-  Pune Crime | FIR in Hadapsar Police Station

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update