Pune Crime | कोरोनाच्या संचारबंदीत सिंहगड पायथ्याशी ‘छमछम’, 10 जणांवर FIR; आंबेगावमधील प्रसिद्ध डॉक्टर फरार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनामुळे पुणे जिल्ह्यात (Pune Crime) संचारबंदी लागू करण्यात आली असताना सिंहगड किल्ल्याच्या (Sinhagad Fort) पायथ्याशी गोळवेडी येथील सानवी रिसॉर्टमध्ये (Sanvi Resort) डान्स पार्टी (Dance party) सुरु होती. या डान्स पार्टी पुणे ग्रामीण पोलिसांच्या (Pune Rural Police) स्थानिक गुन्हे शाखेच्या (local crime branch) पथकाने छापा टाकून हॉटेल मालकासह 6 पुरूष व 4 महिलांवर गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये हॉटेल मालकाचा मित्र असलेला आणि आंबेगाव मधील भाकरे मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल (Bhakare Multispeciality Hospital) मधील डॉक्टर निखील भाकरे अंधाराचा फायदा घेऊन फरार झाला आहे. हा प्रकार उघडकीस आल्याने पुण्यात खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी विनय सुभाष कांबळे (Vinay Subhash Kamble) (वय-32 रा. आकाश नगर, वारजे), संदीप शंकर कोतवाल (Sandeep Shankar Kotwal) (वय-47 रा. हिंगणेमळा, हडपसर), सचिन विठ्ठल शिंदे (Sachin Vittal Shinde) (वय-38 रा. आनंदनगर, सिंहगड रोड), कालीदास शशिराव काकडे (Kalidas Shashirao Kakade) (वय-50 रा. हडपसर), विठ्ठल विजय मोरे (Vitthal Vijay More) (वय-43 रा. हडपसर), राजेश बलभिम वाघमारे (Rajesh Balbhim Waghmare) (वय-45 रा. हडपसर) व चार महिलांवर हवेली पोलीस ठाण्यात (Haveli police station) भा.द.वि कलम 269,270,188 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर डॉ. निखील भाकरे (Dr. Nikhil Bhakare) फरार झाला आहे.

 

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक (Local Crime Branch, Pune) हे हद्दीत गस्त घालत असताना सिंहगड पायथ्याशी गोळेवाडी येथील सानवी रिसॉर्टमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग करुन डान्स पार्टी सुरु असल्याची माहिती मिळाली. रिसॉर्ट मालक विनय कांबळे (Vinay Kamble) आणि आंबेगाव मधील दत्तनगर चौकात असलेल्या भाकरे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे ((Bhakare Multispeciality Hospital))  डॉ. निखील भाकरे (Dr. Nikhil Bhakare) यांनी डान्सपार्टीचे आयोजन केले होते. पोलिसांनी याठिकाणी छापा टाकला असता साउंड सिस्टीमवर गाणी लावून एल.ई.डी (LED) लावून काही लोक नाचत असल्याचे दिसले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

या ठिकाणी नाचणाऱ्या व्यक्तींनी आणि इतर चार महिलांनी तोंडाला मास्क न लावता नाचत असल्याचे दिसून आले.
पोलिसांनी सहा पुरुष आणि चार महिलांवर कारवाई करुन त्यांच्यावर हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
दरम्यान, पोलिस आल्याचे समजताच डॉ. निखील भाकरे (Dr. Nikhil Bhakare) हा अंधाराचा फायदा घेऊन फरार झाला.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख (Superintendent of Police Dr. Abhinav Deshmukh)
यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक विवेक पाटील (Additional Superintendent of Police Vivek Patil),
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट (Police Inspector Padmakar Ghanwat),
सहायक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे (API Netaji Gandhare),
पोलीस हवालदार पासलकर, क्षिरसागर, मंगेश भगत अमोल शेडगे, महिला पोलीस हवालदार नंदा कदम यांच्या पथकाने केली.

Web Title :- Pune Crime | FIR lodged against 10 persons by Pune Rural Police for organizing dance party at Sanvi Resort near Sinhagad Fort during Corona period. dr. Nikhil Bhakre of Bhakre Multi Specialty Hospital is absconding

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | कोरोनाच्या संचारबंदीत सिंहगड पायथ्याशी ‘छमछम’, 10 जणांवर FIR; आंबेगावमधील प्रसिद्ध डॉक्टर फरार

Pune News | पुणे जिल्ह्यात 1 लाख हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या पूर्ण

Bad Habits | ‘या’ 6 सवयी तुमची प्रतिकारशक्ती कमकुवत करतात, जाणून घ्या