Pune Crime | तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी 11 जणांवर लष्कर पोलीस ठाण्यात FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | व्याजाच्या पैशाची (interest money) मागणी करुन जीवे मारण्याची धमकी देऊन युवकाला आत्महत्येस प्रवृत्त (suicide) केल्याप्रकरणी पुण्यातील (Pune Crime) लष्कर पोलीस ठाण्यात (lashkar police station) 11 जणांविरोधात गुन्हा (FIR) दाखल केला आहे. अजीम अशकअली शिवानी (वय-38) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. अजीम याने 9 ऑगस्ट रोजी आत्महत्या केली होती.

अल्ताफ शेख, रेश्मा शेख, आफरीन, सुगरा मेमन, सलीम खान, बंटी सरदार, साजीद, युनूस, मुनिरा
विराणी, अकबर विराणी, सोहेल विराणी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी
अजीमचा यांच्या 42 वर्षीय बहिणीने लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत अजीम शिवानी याने आरोपींकडून व्याजाने पैसे घेतले होते. आरोपींनी व्याजाने दिलेल्या पैशांची मागणी केली. तसेच व्याजाची मागणी करुन शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली. आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत तर अजीज याच्या कोऱ्या कागदावर सह्या व अंगठा घेऊन त्याला मानसिक त्रास (Mental distress) दिला. आरोपींकडून होत असलेल्या त्रासाला वैतागून अजीम शिवानी याने सोमवारी (दि.9) आत्महत्या केली. त्याच्या बहिणीने दिलेल्या फिर्यादीवरुन 11 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास लष्कर पोलीस करीत आहेत.

हे देखील वाचा

Maharashtra Government | पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बाधित व्यापारी, टपरीधारक, व्यावसायिकांना 5 ते 6 % व्याजदराने कर्ज पुरवठा; जाणून घ्या कोणाचा होणार फायदा

MNS Vs Sambhaji Brigade | मनसे-संभाजी ब्रिगेड आमने-सामने, राज ठाकरेंना दिलं चर्चेच निमंत्रण

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune Crime | FIR lodged against 11 at lashkar Police Station for inciting youth to commit suicide

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update