Pune Crime | लग्नाच्या अमिष दाखवून 25 वर्षाच्या तरुणीवर वडकी, लोणावळा, भेकराइनगर येथे नेऊन केला बलात्कार, गोळ्या देऊन ‘गर्भपात’ करणाऱ्या डॉक्टरसह दोघांवर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – लग्नाचे आमिष दाखवून एका 25 वर्षाच्या तरुणीला वेगवेगळ्या लॉजवर नेऊन बलात्कार (Rape) केला. यातून ती गर्भवती (Pregnant) राहिल्यानंतर तिला गोळ्या देऊन तिचा गर्भपात (Abortion) केल्याची धक्कादायक घटना पुण्यात (Pune Crime) घडली आहे. याप्रकरणी पुण्यातील (Pune Crime) लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Loni Kalbhor police station) पीडित तरुणीने फिर्याद दिली आहे. तिच्या तक्रारीनुसार पोलिसांनी डॉक्टरसह दोघांवर गुन्हा (FIR) दाखल करुन हा गुन्हा वानवडी पोलिसांकडे (Wanwadi police) वर्ग केला आहे.

आशिष शैलेश सकपाळ Ashish Shailesh Sakpal (वय 34, रा. संतनगर, लोहगाव) आणि डॉ. दत्ता खैरनार Dr. Datta Khairnar (रा. धानोरी) अशी गुन्हा (FIR) दाखल केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी मांजरी बुद्रुक येथील 25 वर्षाच्या तरुणीने फिर्याद दिली आहे. हा प्रकार सप्टेंबर 2020 ते जून 2021 या कालावधीत घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला आणि आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपीने घरी सोडण्याच्या बहाण्याने तिच्या सोबत अश्लिल चाळे करत लग्नाचे आमिष दाखवले. तसेच लोणावळा (lonavala), वडकी (wadki), भेकराईनगर (bhekrai nagar) येथील लॉजवर नेऊन जबरदस्तीने शरीर संबंध ठेवले. यातून तरुणी गरोदर राहिली. त्यानंतर आरोपीने डॉ. दत्ता खैरनार यांच्याकडे घेऊन गेला. डॉ. खैरनार यांनी तरुणीला गोळ्या देऊन (Pune Crime) तिचा गर्भपात केला.

आरोपीने शरिरसंबंध ठेवतानाचे व्हिडिओ आणि फोटो पीडितेच्या परवानगीशिवाय काढले.
आरोपीने हे फोटो (Photo) आणि व्हिडिओ व्हायरल (Video goes viral) करण्याची धमकी देत लग्न करण्यास नकार देऊन तरुणीची फसवणूक केली.
यानंतर तरुणीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला.
तक्रार अर्जावरुन पोलिसांनी गुन्हा दाखल करुन पुढील तपासासठी वानवडी पोलीस ठाण्याकडे वर्ग केला.
पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) सावळाराम साळगावकर (Police Inspector Savlaram Salgaonkar) करीत आहेत.

हे देखील वाचा

Ahmednagar Crime | शाळकरी विद्यार्थ्यांनी शिक्षिकेचे ‘कडक’ फोटो काढले, ‘मॉर्फ’ करून ‘अश्लील’ छायाचित्रे व्हायरल, अल्पवयीन पोरांचं ‘कांड’

Supreme Court | ‘खंडणी’ गोळा करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना कारागृहात टाकायला हवे – सुप्रीम कोर्ट

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pune Crime | FIR lodged against 25-year-old girl for taking her to Wadaki, Lonavla, Bhekrainagar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update