Pune Crime | मंगळवार पेठेत तरुणाच्या डोक्यात बिअरची बाटली फोडून मारहाण, सराईत गुन्हेगारसह 7 जणांवर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | भांडणाचा (Dispute) राग मनात धरुन सराईत गुन्हेगाराने (Criminal) त्याच्या साथिदारांच्या मदतीने एका तरुणाला बेदम मारहाण (Beating) करुन जखमी केले. हा प्रकार मंगळवार पेठेत (Mangalwar Peth) बुधवारी (दि.30 मार्च) दुपारी दीडच्या सुमारास (Pune Crime) घडला आहे. पोलिसांनी (Pune Police) सात जणांवर गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

 

निलेश विष्णु कांबळे Nilesh Vishnu Kamble (वय – 26 रा. 216 मंगळवार पेठ, पुणे) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्याने फरासखाना पोलीस ठाण्यात (Faraskhana Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पोलिसांनी ओंकार मासाळ उर्फ हर्षद शेख (रा. मंगळवार पेठ), बाबू उर्फ मोहसिन शेख, भैय्या शिंदे (रा. कसबा पेठ), व्हल्या आणि इतर दोन ते तीन जणांवर गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे. ओंकार मासाळ हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी यांचे 29 मार्च रोजी भांडण झाले होते. या भांडणाचा राग मनात धरुन आरोपींनी फिर्यादी हा त्याच्या मित्राच्या खोलीत झोपलेला असताना रात्री झालेल्या भांडणावरुन फिर्यादीला मारहाण केली. तसेच फिर्यादीच्या डोक्यात बिअरची बाटली (Beer Bottle) मारुन जखमी (Injured) केले. आरोपींनी लाकडी दांडके, लोखंडी कोयते घेऊन परिसरात दहशत निर्माण केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अभंग (API Abhang) करीत आहेत.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा 

 

Web Title :- Pune Crime | FIR lodged against 7 persons including a criminals in mangalwar peth pune

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा