Pune Crime | महाराष्ट्र एल्गार सेनेच्या अध्यक्षा विष्णू कुऱ्हाडेवर खंडणीचा FIR

पुणे / आळंदी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | एका दुकानदार तरुणाचे एक महिलेसोबत वाद झाले होते. हे वाद मिटवण्यासाठी महाराष्ट्र एल्गार सेनेचा अध्यक्ष (Maharashtra Elgar Sena President) विष्णू कुऱ्हाडे याने तरुणाकडून 2 लाख 84 हजार रुपयांची खंडणी (ransom) घेतली. हा प्रकार डिसेंबर 2020 ते 2 एप्रिल 2021 या कालावधीत आळंदी (Pune Crime) येथे घडला आहे. याप्रकरणी कुऱ्हाडे याच्यावर आळंदी पोलीस ठाण्यात (Alandi Police Station) खंडणीचा गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

दत्ता लक्ष्मण झिटे (वय-30 रा. गणेश कॉलनी, गंधर्व नगरी, मोशी) याने आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दत्ता झिटे याच्या फिर्यादीवरुन आळंदी पोलिसांनी महाराष्ट्र एल्गार सेना अध्यक्ष विष्णू सुभाष कुऱ्हाडे Vishnu Subhash Kurhade (रा. वडगाव रोड, प्रियदर्शनी स्कुल जवळ, आळंदी) याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्ता झिटे यांचे आळंदी-मरकळ रोडवर (Alandi-Markal Road) रमेश स्विट होम नावाचे दुकान आहे. दत्ता यांचे एका महिलेसोबत वैयक्तिक वाद झाला आहे. दरम्यानच्या काळात दत्ता यांची ओळख महाराष्ट्र एल्गार सेनाचा अध्यक्ष विष्णू कुऱ्हाडे याच्यासोबत ओळख झाली. फिर्यादीने महिलेसोबत असलेले वाद मिटवण्याची विनंती कुऱ्हाडे याला केली. हे वाद मिटवण्यासाठी कुऱ्हाडे याने फिर्यादी याच्याकडून रोख, गुगल पे (Google Pay), क्रेडिट कार्ड (credit card) याद्वारे 2 लाख 84 हजार रुपये खंडणी उकळून त्यांना मानसिक त्रास दिला. पुढील तपास आळंदी पोलीस करीत आहेत.

हे देखील वाचा

Closed Currency | 2 रुपयांचे ‘हे’ नाणे बदलू शकते तुमचे नशीब, मिळू शकतात लाखो रुपये; जाणून घ्या कसे

तात्काळ अपडेट करा तुमचा Smartphone, आता हसून उघडू शकता फोनचा कॅमेरा; तोंड उघडल्यावर दिसतील मेसेज

Honey Trap Racket Pune | धक्कादायक ! निवृत्त एअर फोर्स अधिकार्‍याला हनी ट्रॅपमध्ये अडकवून लुटण्याचा प्रयत्न; विमानतळ पोलिसांकडून तिघांना अटक

ट्विटर ला देखील फॉलो करा

 

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pune Crime | FIR of ransom on Maharashtra Elgar Sena president Vishnu Kurhade

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update