Pune Crime | बसण्यास खुर्ची न दिल्याने टोळक्यांचा कात्रजमध्ये ‘राडा’ ! दोघा तरुणावर वार करुन हॉटेलवर केली दगडफेक, कोंढव्यात गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | हॉटेलमध्ये बसलेल्या तरुणांनी बसण्यास खुर्ची न दिल्याच्या रागातून एका सराईत गुंडाच्या (Pune Criminals) टोळक्याने तरुणांना कोयता, पालघनने मारहाण करुन जखमी केले. परिसरातील दुचाकी फोडून हॉटेलवर दगडफेक करीत राडा घातला. (Pune Crime)

 

या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी (Kondhwa Police) सराईत गुन्हेगार रुपेश घोरे व त्यांच्या टोळीतील शुभम नाईक, अंक्या भोसले, निखील, अर्जुन, भावड्या जगताप, गणेश इंगळे, सोमा व इतर साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

 

याप्रकरणी लक्ष्मण नस्सय्या बंगारी (वय २३, रा. सिद्धार्थनगर, बिबवेवाडी) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ६३९/२२) दिली आहे.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्यांचे मित्र राहुल खरात व मयुर भडाव्वे यांचे सह सरपंच हॉटेलमध्ये बुधवारी रात्री नऊ वाजता खुर्चीवर बसून चहा पित होते.
फिर्यादी यांच्या ओळखीचे आरोपी या हॉटेलमध्ये दारु पिण्यासाठी आले. त्यांना बसण्यासाठी खुर्ची नसल्याने त्यांनी फिर्यादीची खुर्ची मागितली.
फिर्यादी यांनी खुर्ची दिली नाही. त्यामुळे त्यांच्यात शाब्दिक वाद झाला होता.
त्या रागातून आरोपींनी कोयते, पालघन व लाकडी बांबु येऊन ती हवेत भिरकावून आम्ही इथले भाई आहोत.
आमच्या नादी लागू नका, नाही तर एक, एकाला संपवून टाकील,
असे म्हणून फुटपाथवर बसलेल्या लोकांना शिवीगाळ करुन मारहाण करीत त्यांना हकलून दिले.
फिर्यादी यांना जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांच्यावर कोयत्याने व लाकडी बांबुने वार केले.
राहुल खरात याच्या डोक्यात दगड मारुन जखमी केले. मयुर भडाव्वे याला मारहाण केली. तेथे असलेल्या इतर दुचाकी फोडल्या.
सरपंच हॉटेल, एअरकिंग परमिट बार व तेथील इतर दुकानांवर दगड व बाटल्या मारुन २० हजार रुपयांचे नुकसान केले.
पोलीस उपनिरीक्षक सोनवणे तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | FIR On Pune Criminals In Kondhwa Police Station Attempt To Murder Kill

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sanjay Raut On BJP | नारायण राणेंनी शरद पवारांना दिलेल्या इशाऱ्यानंतर संजय राऊतांचा भाजपला सवाल; म्हणाले…

 

Eknath Shinde | ‘माझ्यासोबत 50 आमदार, आजच्या बैठकीत निर्णय घेऊ’ – एकनाथ शिंदे

 

Nitesh Rane | एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर नितेश राणेंचा मुख्यमंत्री ठाकरेंना टोला; म्हणाले – ‘त्यांना ‘शिंदे सेना’ म्हणण्याऐवजी…’