Pune Crime | पुण्यात निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाकडून हॉटेलमध्ये गोळीबार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाने मुंढव्यातील एका हॉटेलमध्ये पिस्तुलातून गोळीबार (Firing) केल्याची घटना समोर आली आहे. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. याप्रकरणी (Pune Crime) मुंढवा पोलीस ठाण्यात (Pune Police) गुन्हा दाखल करुन आरोपीकडून पिस्तुल जप्त (Pistol Seized) करण्यात आले आहे. हा प्रकार रविवारी (दि.11) सकाळी नऊच्या सुमारास एन.बी.सी रोडवरील हॉटेल अनवाइंड (Hotel Unwind) आवारात घडला.

 

विजय शरद माने Vijay Sharad Mane (वय-43 रा.वृंदावन सोसायटी, पंचवटी, पाषाण) याच्यावर मुंढवा पोलीस ठाण्यात (Mundhwa Police Station) आपीसी 336 व आर्म अॅक्टनुसार (Arm Act) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस हवालदार संतोष विठ्ठल जगताप Police Constable Santosh Vitthal Jagtap (वय-50) यांनी बुधवारी (दि.14) फिर्याद दिली आहे.

आरोपी विजय याचे वडील शरद माने हे पुणे पोलीस दलात सहायक पोलीस आयुक्त (Assistant Commissioner of Police (ACP) होते. विजय आणि त्याचे मित्र रविवारी सकाळी हॉटेलमध्ये गेले होते.
त्याठिकाणी असणाऱ्या एकाशी त्याचे किरकोळ कारणावरून वाद झाले.
यातूनच त्याने हवेत गोळीबार करुन दहशत निर्माण केली.
गोळीबाराच्या घटनेनंतर हॉटेलमध्ये घबराट उडाली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही.

 

घटनेची माहिती मिळताच मुंडवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल आरोपीला ताब्यात घेतले.
तसेच त्याच्याकडे परवाना असलेली 1 लाख रुपयांची पिस्तूल आणि 250 रुपयांचे पाच जीवंत काडतुसे जप्त करुन गुन्हा दाखल केला आहे.
आरोपीला CRPC कलम 41 (1)(अ) नुसार नोटीस देण्यात आली आहे.
पुढील तपास मुंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवाडी
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भोसले (PSI Bhosale) करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | firing in air at hotel by the son of a retired police officer acp in Pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | वारजे माळवाडीतील जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेचा छापा, 21 जण ताब्यात

Bad Cholesterol | ‘ही’ एक गोष्ट खाल्ल्याने नसांमध्ये जमणार नाही ‘बॅड कोलेस्ट्रॉल’, आजपासून खायला करा सुरूवात

Pune Pimpri Crime | रिक्षा चालकाकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, वाकड परिसरातील घटना